Independence Day 15th August : देशवासीयांसाठी मोठ्या गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. आपण यंदा 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा (Independence Day) करणार आहात. देशभरात सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजीत केले जातात. देशभक्तीची भावना आणि देशाप्रतीचे आपलं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमपासून परेडपर्यंत अनेक गोष्टींचं आयोजन देशातील गल्ली बोळ्यात दिसतं. अख्खा देश या दिवशी भक्तीमय झालेला असतो.  (difference between flag hoisting and flag unfurling on independence day 2023 in marathi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्यावरून ध्वजारोहण करतील आणि देशवासीयांना संबोधित करतात. पण तुम्हाला माहिती आहे का स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी तिरंग्याबाबत वेगवेगळे नियम असतात. ज्याला आपण सामान्य भाषेत ध्वजरोहण (Flag Hoisting) आणि ध्वज फडकवणं  (Flag Unfurling) असं म्हणतो. 


खरं तर खूप कमी लोकांना या दोन्ही शब्दांमधील फरक माहिती आहे. विद्यार्थ्यांना हा फरक माहिती असेल पण प्रत्येक भारतीयांना हा फरक माहिती असं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यदिनाला ध्वजारोहण करण्यात येतं तर प्रजासत्ताक दिनाला तिरंगा फडकवला जातो.  


ध्वजारोहण म्हणजे काय?


15 ऑगस्ट 1947 पासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ध्वजारोहण करतात. स्वातंत्र्यदिनी, तिरंगा खांबाच्या तळाशी बांधला जातो, जो स्ट्रिंगने खेचून वर आणला जातो आणि नंतर फडकवला जातो. ध्वजारोहण हे नवीन राष्ट्राच्या उदयाचं प्रतीक मानलं जातं. हे भारताचा उदय आणि ब्रिटिश राजवटीचा अंत म्हणून देखील चिन्हांकित आहे.


ध्वज फडकवण्याचा अर्थ काय?


26 जानेवारी 1950 ला भारतीय प्रजासत्ताक घोषित करण्यात आला म्हणून या दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी, देशाचे राष्ट्रपती राजधानी दिल्लीत असलेल्या राजपथ वर तिरंगा फडकवतात. यादिवशी ध्वज हा खांबाच्या वरच्या बाजूला आधीच बांधलेला असतो. जो स्ट्रिंगमधून खेचून राष्ट्रपती उघडतात. ध्वज फडकवणे हे राष्ट्राचं पंख पसरून नवीन युगाची व्याख्या म्हणून पाहिलं जातं.