Trending News :  तुम्ही IAS किंवा IPS ची तयारी करत आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC नागरी सेवा परीक्षेला बसतात. या परीक्षेत सगळ्यांनाच यश येत नाही. जे मुलं या परीक्षेत यशस्वी होतात त्यांची  IAS, IPS, IES किंवा IFS अधिकारी म्हणून निवड केली जाते. या सगळ्या अधिकाऱ्यांना एकच परीक्षा द्यावी लागते, मात्र त्यांची कामं हे वेगवेगळी असतात. अगदी त्यांचा भूमिकाही वेगळ्या असतात. आज आपण जाणून घेऊयात की IAS आणि IPS मध्ये कोण जास्त पावरफूल असतात.



UPSC परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर IAS-IPS साठी निवड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परीक्षेत उत्तीण झालेल्या सर्व उमेदावारांना DAF हा अर्ज भरावा लागतो. या अर्जात त्यांना सर्व माहिती द्यावी लागते. या अर्जाच्या आधारावर विद्यार्थ्याची व्यक्तिमत्व चाचणी होते. या अर्जातील माहितीच्या आधारे त्यांना मुलाखतीत प्रश्न विचारले जातात. आता मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीत मिळालेले गुण हे एकत्र करु त्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. या सगळ्यानंतर ऑल इंडिया रँकिग ठरलं जातं. ही गुणवत्ता यादीत जनरल, SC, ST, OBC, EWS या आधारे तयार केली जाते. 



IAS, IPS किंवा IFS रँक मेरिट लिस्टमधील रँकिंगच्या आधारावर केली जाते. या गुणवत्ता यादीत अव्वल क्रमांक मिळणाऱ्यांना IAS पद दिलं जातं. तर त्यानंतर त्यांची IPS, IFS  आणि आयआरएस पदासाठी निवड केली जाते. अनेक वेळा टॉप रँक मिळणाऱ्यांना IPS बनायची इच्छा असते तर कमी रँक असलेल्यांनाही IAS हे पद मिळू शकतं. 



IAS-IPS प्रशिक्षण एकत्र 


IAS-IPS प्रशिक्षण हे लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), मसुरीमध्ये एकत्र होतं. तीन महिन्यांसाठी सर्व उमेदवारांना मूलभूत प्रशासकीय कौशल्ये शिकवली जातात. तसंच मानसिक आणि शारीरिक ताकदीचे प्रशिक्षणही दिलं जातं. 


या निवड झालेल्या अधिकाऱ्यांसाठी भारत दिनचं आयोजन केलं जातं. या सोहळ्यात सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या राज्याची संस्कृतीचं दर्शन घडवायचं असतं. हा सोहळ्यात पोशाख, लोकनृत्य आणि खाद्यपदार्थांतून देशाची विविधतेतील एकता दर्शवायची असते. या प्रशिक्षणदरम्यान अधिकाऱ्यांना गावभेटी आणि दुर्गम भागातील गावात 7 दिवस मुक्काम करावा लागतो. या प्रशिक्षणदरम्यान अधिकाऱ्यांना गावातील आयुष्यातील विविध बाजू समजून घेण्याची संधी मिळते. 


3 महिन्यांनंतर IAS-IPS प्रशिक्षण वेगळ


IAS अधिकारी आणि IPS अधिकारी यांची कामं ही पूर्णपणे वेगवेगळी असतात. त्यामुळे 3 महिन्यानंतर त्याचे प्रशिक्षण वेगवेगळी होतात.  IPS साठी निवडलेल्या अधिकाऱ्यांना  हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA)मध्ये प्रशिक्षण दिलं जातं. तर IAS अधिकाऱ्यांना लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA)मध्ये पुढील प्रशिक्षण दिलं जातं.


IAS अधिकाऱ्यांना अधिक खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे त्यांना घोडेस्वारी, परेड आणि शस्त्रे हाताळणे यासारखे प्रशिक्षण दिलं जातं. 3 महिन्यांचा प्रशिक्षणानंतर आयएएस अधिकाऱ्याचे व्यावसायिक प्रशिक्षण सुरू होते आणि यामध्ये प्रशासनाच्या प्रत्येक क्षेत्राची माहिती दिली जाते.


काय आहे IAS-IPS च्या जबाबदाऱ्या?


बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, प्रशिक्षणानंतर IAS अधिकाऱ्यांना क्षेत्र/जिल्हा/विभागाचे प्रशासन हाताळण्याची जबाबदारी दिली जाते.  IAS अधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्राच्या विकासासाठी प्रस्ताव द्यावा लागतो. तसंच त्यांच्या क्षेत्रात सर्व धोरणे अंमलात आणायची असतात. IAS अधिकाऱ्यांना आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातात.


IPS अधिकाऱ्याची जबाबदारी आपल्या क्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा असतो. त्याशिवाय गुन्ह्यांचा तपास त्यांना करायचा असतो. IPS अधिकारी ड्युटीवर असताना त्यांना गणवेश घालावा लागतो. तर  IAS अधिकाऱ्याला कुठलाही ड्रेस कोड नसतो. IPS अधिकाऱ्यांना विविध पदांवर अंगरक्षक, वाहन आदी सुविधा मिळतात. तर संपूर्ण पोलीस दल आयपीएस अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करतात. 



IAS आणि IPS मध्ये कोण जास्त पॉवरफूल?


IAS आणि IPS अधिकाऱ्यांची कामं ही पूर्णपणे वेगळी असतात. म्हणून त्यांचे अधिकारही वेगळे असता. IAS अधिकाऱ्यांना सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाद्वारे काम पाहावे लागते. तर IPS अधिकाऱ्यांवर केंद्रीय गृह मंत्रालयाचे नियंत्रण असते.  IAS अधिकाऱ्यांचा पगार हा  IPS अधिकाऱ्यांपेक्षा जास्त असतो. एका क्षेत्रात फक्त एकच IAS अधिकारी असतो. मात्र एकाच क्षेत्रात गरजेनुसार IPS अधिकाऱ्यांची संख्या कमी-अधिक असते. त्यामुळे पगार आणि अधिकार पाहता IAS अधिकाऱ्यांचा दर्जा हा  IPS अधिकाऱ्यांपेक्षा पॉवरफूल असतो.