आपल्या वैवाहित जीवनात अडचणी येत आहेत? यापैकी एक उपाय देखील जीवन सुखी करेल, जाणून घ्या
नवरा-बायकोमध्ये (Husband-Wife) वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु पुन्हा पुन्हा अनावश्यकपणे वाद होत असेल तर ही चिंता करण्याची बाब आहे.
मुंबई : नवरा-बायकोमध्ये (Husband-Wife) वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु पुन्हा पुन्हा अनावश्यकपणे वाद होत असेल तर ही चिंता करण्याची बाब आहे. हा वाद मोठया भांडणात बदलतो. अशा परिस्थितीमागे घराच्या वास्तूतील (Home Vastu) समस्या, कुंडलीतील ग्रह दोष Grah Dosh) इत्यादी कारणे असू शकतात. म्हणून, हे दोष दूर करणे आवश्यक आहे. यासाठी काही सोप्या उपाययोजना करून वैवाहिक जीवन (Married Life) सुखी केले जाऊ शकते.
वैवाहिक जीवन सुखी बनवण्याचे मार्ग
मीठ टाकून लादी साफ करा : घरात वास्तू दोषामुळे निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा भांडणे निर्माण करते. अशा परिस्थितीत घराचे मोपिंग करताना पाण्यात थोडे मीठ मिसळल्यास घरात शांती मिळेल.
कपूर जाळा : दररोज सकाळी आणि संध्याकाळी संपूर्ण घरात कापूर दाखवा. यामुळे वास्तू दोष देखील दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते.
भगवान विष्णू आणि लक्ष्मीजी यांची पूजाः शुक्रवारी भगवान विष्णू आणि लक्ष्मीजी यांची एकत्रित उपासना करा आणि त्यांना रसवाली मिठाई अर्पित करा. नवरा-बायकोने हा प्रसाद खावा, यामुळे त्यांच्या नात्यात गोडवा येईल.
हळदीचा उपाय: हळद पिवळ्या धाग्याने 7 गाठी बांधून घ्या. यानंतर, उजव्या हातात हळद गाठी घ्या आणि 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:' हा मंत्र 7 वेळा जप करा. मग हे गाठ एका लाल कपड्यात बांधून बेडरूममध्ये अशा ठिकाणी ठेवावे जिथे कोणालाही दिसत नाही. असे केल्याने वैवाहिक जीवन (Married Life) सुखी होते.
(टीपः या लेखात दिलेली माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. Zee 24 Taas News त्यास पुष्टी देत नाही.)