नवी दिल्ली: एकीकडे काँग्रेसकडून विरोधकांना भाजपविरोधात एकदिलाने लढण्याचे आवाहन केले जात असताना प्रत्यक्ष पक्षातच किती वाद आहेत, याचे उदाहरण नुकतेच समोर आले. एकेकाळी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरवणारे आणि पक्षाचा प्रमुख चेहरा असणारे दिग्विजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली खंत बोलून दाखविली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी काँग्रेसचा प्रचार केला तर पक्षाला एकही मत मिळणार नाही, असे उपरोधिक विधान त्यांनी केले. दिग्विजय सिंह दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जीतू पटवारी यांच्या घरी गेले होते. तिथून निघताच अनेक कार्यकर्ते सिंह यांच्यासमोर गोळा झाले. या कार्यकर्त्यांशी दिग्विजय यांनी संवाद साधला.


यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काही सल्ले दिले.  'काम केलं नाहीत, तर फक्त स्वप्न बघत राहाल. असं केलंत, तर सरकार स्थापन करु शकणार नाही. तुमच्या शत्रूला तिकीट मिळालं, तरी त्याला निवडून आणा, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले. 


ते म्हणाले, माझं फक्त एकच काम आहे. कोणता प्रचार नाही, कोणतेही भाषण नाही. माझ्या भाषणामुळे काँग्रेसची मते घटतात. त्यामुळे मी कुठेही जात नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.