भोपाळ : सध्या मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आपली पत्नी अमृता सिंह यांच्यासोबत नर्मदा परिक्रमेवर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी दिग्विजय सिंह यांची यात्रा मोरटक्का इथं दाखल झाली तेव्हा त्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया कच्च्या रस्त्यानं दाखल झाले. सिंधिया या यात्रेत जवळपास तीन तासांसाठी सहभागी झाले होते. 


यात्रेदरम्यान, नर्मदेकिनारी एक नाला आला... हा नाला ज्योतिरादित्य आणि दिग्विजय यांनी पार केला... परंतु, दिग्विजय सिंह यांच्या पत्नी अमृता या मात्र पाण्याच्या प्रवाहात अडकल्या. त्यांना पुढे जाता येत नव्हतं. 


यावेळी सिंधिया यांनी कार्यकर्त्यांना अमृता यांची मदत करण्यासाठी विनंती केली. यानंतर कार्यकर्त्यांनी अमृता यांना नाला पार करण्यास मदत केली. 


मोरटक्का पोहचल्यानंतर दिग्विजय आणि अमृता यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. उल्लेखनीय म्हणजे दिग्विजय सिंह यांच्या नर्मदा यात्रेचे ३२ दिवस पूर्ण झालेत. अजून त्यांची यात्रा सुरू आहे.