नवी दिल्ली :  बातमी उपराष्ट्रपती पदासंदर्भात आहे.  सुरेश प्रभूंना (Suresh Prabhu) उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंनी अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली. त्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. मोदी शाह आणखी मोठा धक्कातंत्र देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे माजी शिवसैनिकाला उपराष्ट्रपतीपद (Vice President) मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (discussion that former union minister suresh prabhu will get the post of vice president)


कोण आहेत सुरेश प्रभू? (Who is Suresh Prabhu)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक अशी सुरेश प्रभू यांची ओळख आहे. प्रभू बाळासाहेबांच्या काळातील कोकणातील शिवसेनेचे नेते होते. प्रभू 1996 मध्ये राजापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. प्रभूंकडे वाजपेयी सरकारमध्ये वन आणि पर्यावरण खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. 


मनमोहन सिंह प्रंतप्रधान असताना प्रभू नद्याजोड प्राधिकरणचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी मोदी सरकारमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्रीपदाचा कारभार पाहिला होता. प्रभू यांना तगडा अनुभव आहे. त्यामुळे आता प्रभूंना उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.