Hardik Patel: हार्दिक पटेलचा `भगवा` अवतार! WhatsApp Bioमधून काँग्रेस गायब
Hardik Patel WhatsApp Bio change: आता गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल याच्याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. हार्दिक भाजपसोबत जाण्याची अटकळे बांधण्यात येत आहेत.
मुंबई : Hardik Patel WhatsApp Bio change: राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. आपापल्या सोयीनुसार आणि नफा-तोट्याच्या जोरावर इथे लोक एकमेकांपासून वेगळे होतात किंवा दुसऱ्या पक्षात जात असतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. अनेकदा धर्माच्या नावावर युती केल्याचे सांगितले जाते. मात्र, युतीच्या नात्यांमध्ये चढ-उतार होतात. अशा स्थितीत आता गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल याच्याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. हार्दिक भाजपसोबत जाण्याची अटकळे बांधण्यात येत आहेत.
हार्दिक काँग्रेसचा 'हात' सोडणार?
अहमदाबादच्या राजकीय वातारणात एक जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पटेल लवकरच काँग्रेस (Congress) सोडून भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार का, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. व्हॉट्सअॅपवर पोस्ट केलेल्या त्याच्या नव्या फोटोच्या अटकळांना जोर धरला आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन DPमध्ये (डिस्प्ले पिक्चर) हार्दिक पटेल भगवा हार्दिक पटेल याचा 'भगवा' अवतार दिसत आहे. हार्दिक पटेलने व्हॉट्सअॅपसह टेलिग्रामचा डिस्प्ले फोटो बदलला आहे. WhatsApp Bioमधून काँग्रेस गायब झाले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना जोर आला आहे.
स्वतः रामभक्त म्हटले आहे
हार्दिक पटेलच्या पक्ष बदलाच्या बातम्यांनी जोर पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही. हार्दिक पटेल (Hardik Patel) सध्या गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. मात्र काही काळापासून ते पक्षाच्या हायकमांडवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये त्यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले होते. हार्दीक पटेल यांना पक्षात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही.
भाजपचे कौतुक
काही दिवसांपूर्वीच हार्दिक याने स्वतःला राम भक्त म्हणवून घेतले होते. हार्दिकने आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या विधीला चार हजार भगवत गीता वाटल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी असेही सांगितले की, आम्ही हिंदू धर्माचे आहोत आणि आम्हाला हिंदू असल्याचा अभिमान आहे. यावेळी ते स्थानिक नेतृत्वावर प्रचंड नाराज आहेत. हार्दिकने नुकतेच भाजपचे कौतुकही केले होते.