चंदीगड : कोणताही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना चांगली शिकवणूक देतो, चांगल्या वाईटाची समज देतो, त्याला आयुष्यातील योग्य मार्ग दाखवतो. म्हणूनच मुलांचे आई-वडील मुलांना विश्वासाने शिक्षकांकडे योग्य मार्गदर्शन आणि ज्ञान, संस्कार मिळवण्यासाठी पाठवतात. परंतु हरियाणामधील एका शिक्षिकेने जे काही केलं आहे, ज्यामुळे एक विद्यार्थी आपल्या आयुष्यातील योग्य मार्गच विसरला आहे. चांगले वाईट यामधील फरक विसरला आहे. आम्ही हे बोलत आहोत कारण, हरियाणाच्या पानिपत शहरातील एक महिला शिक्षिका एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला घेऊन पळून गेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पानीपतमधील देशराज कॉलनीमध्ये खासगी शिकवणी देणाऱ्या या शिक्षिकेचा घटस्फोट झाला आहे आणि ती आपल्या आईच्या घरी रहाते. तेथे ती आपला उदर निर्वाह करण्यासाठी मुलांचे खासगी शिकवणी घेते.


29 मे रोजी मुलाच्या वडीलांनी जिल्हा पोलिस ठाण्यात रिपोर्ट नोंदवला की, त्यांचा मुलगा दुपारी 2 वाजता एका शिक्षिकेचा घरी शिकवणीसाठी गेला होता. परंतु त्यानंतर तो घरी परत आला नाही. शिक्षिकेच्या घरी या संदर्भात विचारपुस केली असता पहिले तर त्या महिलेच्या घरच्यांनी काही सांगितले नाही. परंतु नंतर मग शिक्षिकेच्या वडीलांनी सांगितले की, ती बेपत्ता आहे.


त्यानंतर पोलिसांनी त्या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्या दोघांनाही फोन लावला परंतु दोघांचेही फोन बंद येत आहेत. अद्याप या दोघांची माहिती मिऴाली नाही. परंतु चौकशी दरम्यान समोर आले की, दोघेही घरातून एकही वस्तू किंवा किमती वस्तू न घेताच पळून गेले आहेत. फक्त त्या शिक्षिकेच्या हातात एक सोऩ्याची अंगठी होती, ती घेऊन ते दोघे ही फरार झाले आहेत.


17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला घेऊन पळालेली ही महिला या मुलाला 2 वर्षांपासून ओळखत होती. कोरोनाकाळात लॉकडाऊन लागल्यामुळे अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हाणून खासगी शिकवणीसाठी तो 17 वर्षाचा मुलगा जायचा.


तो दररोज 4 तासांसाठी त्या शिक्षिकेकडे जायचा. त्यांचे प्रेम प्रकरण असल्यामुळे समाज ते स्वीकारणार नाही या भितीने ते पळून गेल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. परंतु आद्याप पोलिसच्या हाती काहीच लागले नाही. या दोघांचा शोध सुरु आहे.