नवी दिल्ली : दिवाळीत सर्वत्र रोषणाई पहायला मिळते आणि त्यासोबतच घराबाहेर काढल्या जातात रांगोळ्या. दररोज विविध प्रकारच्या डिझाईनच्या रांगोळ्या काढून त्यात रंग भरले जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रांगोळीच्या रंगांनी आपल्या आयुष्यात आणि उत्सवातही वेगळ्या प्रकारचे रंग भरले जातात. तुम्ही एकसारखी रांगळी काढून कंटाळले आहात? तर काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला अशाच काही क्रिएटीव्ह रांगोळ्यांच्या डिझाईन्स दाखवणार आहोत. ज्या काढल्यानंतर सर्वचजण तुमचं कौतुक करतील.



भारतात केवळ दिवाळीतच नाही तर खास कार्यकमांदरम्यानही रांगोळ्या काढल्या जातात. पाहूण्यांच्या स्वागतासाठीही रांगोळ्या काढल्या जातात.



रांगोळी काढत असताना आपल्याकडून चूक होईल असं तुम्हाला वाटत असेल तर थेट पावडरचा वापर न करता खडू किंवा पेन्सिलचा वापर करा.



सर्वातआधी डिझाईन बनवून घ्या आणि मग, रंग भरण्यास सुरुवात करा. असं केल्यास चूक होण्याची शक्यता फार कमी असते.