Diwali Festival: भारतात अनेक सण साजरे केले जातात. प्रत्येक सणामध्ये नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. पण दिवाळी हा असा सण आहे, ज्यामध्ये देशभर प्रकाशमय वातावरण झालेलं असतं. देशातल्या सर्वसामान्य व्यक्तीपासून ते उच्चभ्रू व्यक्तींपर्यंत सर्वजण दिवाळी साजरा करतात. मुघल काळातील दिवाळी बद्दल अनेक इतिहासकार आणि यूरोपिअन प्रवाशांकडून 'जश्न-ए-चराग़ा' (दिवाळी)चा उल्लेख आढळतो. आज आम्ही तुम्हाला मुघल काळात भारतात कशी साजरी केली जात होती? बाबरपासून ते बहादुर शाह दुसरा पर्यंत कशी दिवाळी साजरा केली गेली? याबद्दल माहिती सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया...


हिंदू-मुस्लिम यांची एकत्र दिवाळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अँड्रयू नावाचे इंग्लंडचे प्रवासी 1904 साली दिल्ली दौऱ्यावर आले असताना त्यांनी मुंशी ज़काउल्लाह यांची भेट घेतली. मुंशी ज़काउल्लाह यांनी लाल किल्ल्याच्या आतली सुबत्ता आणि राहणीमान बघितली होती. अँड्रयूने याबद्दलची सखोल माहिती 'Zakaullah of Delhi' या पुस्तकात दिली आहे. 'मुघल काळात सर्व हिंदू-मुस्लिम लोक धार्मिक सणांना एकत्र येऊन उत्साहाने साजरा करत होते. सर्वजण एकमेकांच्या सणांमध्ये आनंदाने सहभागी होत होते.' असं अँड्रयूने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. 


कसा सजवला जायचा लाल किल्ला?


दिवाळी सण येण्याआधी अनेक महिन्यांपूर्वीपासून लाल किल्ल्यामध्ये तयारी सुरु केली जात होती. आग्रा, मथुरा, भोपाळ, लखनऊ या शहरांमधून दिग्गज हलवाईंना बोलवलं जात होतं. दिवाळी निमित्त मिठाई बनवण्यासाठी खेड्यांमधून देशी तूप मागवलं जात होतं. महलाच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूंनी दिव्यांची सजावट केली जात होती. मुघल बादशाह अकबरच्या काळात दिवाळी सणाची सुरुवात आग्रापासून केली गेली. त्याचबरोबर, शाहजहानने देखील दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरा केली. याच काळात 'आकाश दिवा' लावण्याची सुरुवात झाली.