नवी दिल्ली: दिवाळीची धामधूम देशभरात सुरू आहे. या दिवसात एकमेकांना मिठाई देत आणि दिवे लावून आनंद साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदाची दिवाळी देशाच्या सैनिकांसोबत साजरी करणार आहेत. भारत-चीन सीमेवर जाऊन पंतप्रधान दिवाळीचा उत्सव साजरा करणार आहेत.उरीच्या जवानांनाही पंतप्रधान भेट देण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ मध्ये पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी सियाचिन येथील सैनिकांसोबत दिवाळी साजरा केली. २०१५ मध्ये डोगराई युद्ध स्मारक येथे पंतप्रधानांनी दिवाळी साजरी केली. गतवर्षी २०१६ मध्ये पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेश येथील आईटीबीपी जवानांना भेट दिली होती.
दरम्यान संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील अंदमान आणि निकोबार येथे दिवाळी साजरी करणार आहेत. सीतारामन आजपासून पुढे दोन दिवस अंदमान-निकोबार येथे सैनिकांच्या कुटुंबांना भेट देतील.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला देशाला शुभेच्छा दिल्या. इतरांप्रती संवेदना आणि पर्यावरणाप्रति सजगता राखून दिवाळी साजरी करा असे आवाहन त्यांनी केले.


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशवासींयांना ट्विटरच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सर्व नागरिकांना दीपावलीच्या पवित्र उत्सवासाठी मनापासून शुभेच्छा. सर्वांना #हॅप्पी दिवाळी असे त्यांनी आपल्या ट्विटवर लिहिले आहे. उपराष्ट्रापती वेंकय्या नायडू यांनी दिवाळीनिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या.  दिवाळी या प्रकाशाच्या पवित्र सणात आपल्या सर्वांच्या आयुष्यात शांती, समृद्धी आणि समृद्धी येवो अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.