मुंबई : दिवाळीच्या आधी शेअरबाजारात खरेदी करण्यासाठी चांगल्या संधी निर्माण होत आहेत. बाजाराच्या रेकॉर्ड तेजीदरम्यान सेसेंक्सने 61 हजाराचा टप्पा पार केला आहे. तर निफ्टी 18 हजारावर टिकून आहे. बाजाराच्या या तेजीमध्ये अनेक शेअर असे आहेत की, ज्यांचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. या रॅलीनंतर अनेक क्वॉलिटी शेअर आणखी वाढण्याच्या तयारीत आहेत. वेगवेगळ्या ब्रोकरेज हाऊसेसने काही शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. त्याबाबत आढावा घेऊ या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Asian Paints 
एशियन पेंट्समध्ये ब्रोकरेज हाऊस एक्सिस सेक्युरिटीज(Axis Securities )मध्ये 3300 रुपयांचे टार्गेट ठेवून गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. सध्या शेअर 2970 रुपयांवर ट्रेड करीत आहे. 


Indian Hotels 
टाटा ग्रुपची कंपनी इंडियन हॉटेल्समध्ये ब्रोकरेज हाऊस मोतिलाल ओस्वालने गुंतवणूकीचा सल्ला देत 268 रुपयांचे लक्ष निश्चित केले आहे. सध्या या शेअरची किंमत 205 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे.


L&T Finance holdings
L&T फायनान्स होल्डिंगमध्ये ब्रोकरेज हाऊस मोतिलाल ओस्वालने 110 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किंमतीवरून 25 रुपये प्रतिशेअरचा नफा गुंतवणूकदारांना मिळू शकतो.


Havells India 
हॅवेल्स इंडियामध्ये ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटिजने 1650 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. सध्याची ट्रेडिंग किंमत पाहता 365 रुपये प्रतिशेअरचा नफा गुंतवणूकदारांना मिळू शकतो. 


Tata Communications
टाटा कम्यनिकेशनमध्ये ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सेक्युरिटीजने 1750 रुपये टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. सध्याच्या ट्रेंडिंग किंमतीवर 347 रुपये प्रति शेअर्स इतका नफा अपेक्षित आहे.


TVS Motor Company
TVS मोटार कंपनीमध्ये ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सेक्युरिटीज (ICICI Securities)ने 876 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.