मुंबई : प्रत्येकाला अपेक्षीत असतं शेअरमध्ये पैसे गुंतवले की आपल्याला फायदा होणार. पण कोणत्याही कंपनीचे शेअर विकत घेण्याआधी त्या कंपनी बद्दल अधिक माहिती असायलाचं हवी.  काही कंपनीचे शेअर असे असतात जे आपल्याल्या वर्षभरात धनवान बनवतात. आज तुम्हाला सांगणार आहोत  Dixon Technologies कंपनीच्या शेअर्सबद्दल.  Dixon Technologies कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे केवळ एका वर्षात 4 पटीने वाढले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 12 महिन्यात Dixon Technologies कंपनीच्या शेअरमध्ये 302 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 25 जून 2020 साली कंपनीच्या एका  शेअरची किंमत 1 हजार 138.73 रूपये होती. आज तेच शेअर 4 हजार 585 रूपयांवर पोहोचले आहेत. या काळात सेन्सेक्सने 52% रिटर्न्स दिले आहेत.


सांगायचं झालं तर जर गेल्या वर्षी तुम्ही Dixon Technologies कंपनीच्या शेअरमध्ये 5 लाख रूपये गुंतवले असतील तर आज तुमचे ते 5 लाख रूपये 20 लाख रूपयांपोक्षा देखील जास्त झाले असतील.  गुरुवारी एनएसईवर कंपनीचे शेअर 4585 रुपयांवर पोहोचला आणि 4550 रुपयांवर बंद झाला.


महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही कंपनीच्या शेअरमध्ये पैसे गुंतवण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. शेअर बाजारात तज्ज्ञ असलेल्या व्यक्ती कंपनाचा गेल्या वर्षीचा परफॉर्मेंस पाहून गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे मार्केट एक्सपर्ट कोणत्याही कंपनीच्या शेअरबद्दल चांगली माहिती देवू शकतात.