मुंबई : रेल्वेने प्रवास करताना कधी असे प्रसंग येतात जेव्हा आपण हतबल होतो. म्हणजे रेल्वेचं तिकिटं काढायला भली मोठी रांग असते आणि तेवढ्यातच ट्रेनचा भोंगा वाजतो त्यामुळे तिकिटं न घेताच तुम्ही ट्रेनमध्ये चढता. त्यानंतर ट्रेनमध्ये तिकिटाशिवाय चढल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आता असा प्रसंग आला तर घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण आता भारतीय रेल्वे असे काही खास नियम केले आहेत ज्यामुळे तुमचा प्रवास कोणत्याही त्रासाविना होऊ शकतो. 


जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर ही माहिती जाणून घ्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता जर तुम्ही तिकिटाशिवाय प्रवास करत असाल तरीही काही टेन्शन नाही. भारतीय रेल्वे अनेक रिझर्वेशनच्या लोकांना सूट देत आहे. एवढंच काय तर भारतीय रेल्वे अनेक लोकांना फ्री रेल्वे प्रवास करण्याची संधी देते. 


आतापर्यंत आपण ऐकलं आहे की, ट्रेनमध्ये ज्येष्ठ व्यक्तींना आणि अपंग व्यक्तींना सूट दिली जाते. आता यामध्ये बेरोजगार युवांचा देखील समावेश आहे. भारतीय रेल्वे आता अशा लोकांना देखील स्वस्त प्रवास करायला देणार आहे. बेरोजगार युवांना तिकिटावर पन्नास ते शंभर टक्के डिस्काऊंट देणार आहे. 


1 एप्रिलपासू भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये देखील तिकिटं देण्याची व्यवस्था सुरू केली आहे. ज्यामुळे तिकिटाशिवाय प्रवास करणारे प्रवासी टीटीआयशी संपर्क करून तिकिट घेऊ शकतात. याकरता टीटीला हँड हेल्ड मशीन दिली आहे. ज्यामाध्यमाकून टीटी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना तिकिट देणार आहे. 


या हँड हेल्ड मशिनच्या माध्यमातून पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टमच्या सर्वरला कनेक्ट होऊ शकतात. प्रवाशाने तिकिट मागितल्यास मशीनमध्ये नाव, जागेचं नाव टाकताच तिकिट मिळणार आहे. मशिनच्या माध्यमातून रिकाम्या जागांची माहिती दिली जाणार असून त्याचं तिकिट बुक करता येणार आहे. 


जर प्रवाशाची तिकिट वेटिंगमधून क्लिअप झाली नसेल तर टीटीआयकडे जाऊन रिकाम्या सीटची माहिती घेऊन ते तिकिट कन्फर्म करू शकतो. यामुळे रेल्वे टीसीच्या काळ्या कमाईवर देखील बंधन आलं आहे.