नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी व्यक्तीच्या शरीरावर औषधं फवारणी करण्याबाबत खुलासा केला आहे. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लोकांच्या शरीरावर केला जाणारा औषध फवारणीचा शिडकाव व्यक्तीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हानिकारक असून धोका पोहचवू शकतो, असं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलेल्या सल्लामसलतमध्ये, जर कोणी व्यक्ती कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीच्या शरीरावर औषधांचा शिडकाव किंवा फवारणी केल्यावरही त्याच्या शरीरात प्रवेश केलेला व्हायरस नष्ट होत नाही. मंत्रालयाने असं म्हटलं आहे की, असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत जे शरीराच्या बाह्य भागाला संसर्ग मुक्त करत असल्याचं सांगात. 


मंत्रालयाने सांगितलं की, लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी किंवा संसर्गमुक्त करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड सारख्या औषधांच्या शिडकावच्या प्रभावाबाबत अनेक सवाल करण्यात आले होते. 


कोविड - 19चे रुग्ण किंवा संशयित रुग्णांद्वारा वारंवार ज्या ठिकाणी स्पर्श केला जातो अशा ठिकाणी त्या जागेला संसर्गमुक्त करण्यासाठी रासायनिक औषधं किंवा सोल्यूशन इत्यादींचा उपयोग करत सांगण्यात आलं आहे. या प्रक्रियेत खबरदारी घेणं देखील आवश्यक आहे.


आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार, कोणत्याही व्यक्ती किंवा समूहावर अशा प्रकारच्या औषधांची फवारणी करण्याचा सल्ला कोणत्याही परिस्थितीत दिला जात नाही. कोणत्याही व्यक्तीवर किंवा समूहावर रासायनिक द्रव्यांची फवारणी केल्यास शारीरिक, मानसिक नुकसान होऊ शकते.