Swiggy Leave Policy : नोकरी करायची म्हटलं की, कर्मचाऱ्यांना पहिला प्रश्न असतो तो म्हणजे उटसुटत कुठल्याही कारणासाठी सुट्टी मिळणार नाही. अगदी सिक लिव्ह घ्यायची असली तरी डॉक्टरच पत्र लागतं. कुटुंबातील समारंभ असो की अजून कुठलं निमित्त सुट्टी मिळेलच याची काही शाश्वती नाही. प्रत्येक कंपनीचे कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबद्दल वेगवेगळे नियम असतात. सिक लिव्ह, स्पेशल लिव्ह, अर्न लिव्ह आणि कॅज्यूअल लिव्ह हे साधणार कंपनीच्या सुट्ट्यांचा फॉर्म्युला असतो. पण काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी आणि त्यांचं मानसिक आरोग्यासाठी कार्यालयात अनेक सुख सुविधांसह सुट्ट्यांचेही वेगवेगळी धोरण लागू करतात. नुकतंच एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ब्रेकअप लिव्ह (Break Up Leave) लागू केल्याच तुम्ही ऐकलंच असेल. आता भारतातील एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी एका विशिष्ट सुट्टीचं धोरण आखलं आहे, हे धोरण जाणून तुम्ही पण तिथे नोकरी करण्याचा विचार कराल. (Do you have a pet at home Then no tension of vacations swiggy announces new leave policy)


तुमच्या घरात पाळीव प्राणी आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही म्हणत असाल की, असा प्रश्न आम्ही का विचारतोय की, तुमच्या घरा पाळीव प्राणी आहे का? आजकाल बहुताश घरामध्ये कुत्रे, मांजरी असे अनेक प्रकारचे पाळीव प्राणी असतात. पाळीव प्राणी आणि सुट्ट्यांचा काय संबंध असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर ऐका मग भारतातील या कंपनीने अशी घोषणा केलीय की, ज्या कर्मचाऱ्याच्या घरी पाळीव प्राणी असेल त्यांना विशेष लिव्ह मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना कंपनीत पुरक वातावरण मिळावं. त्यांच्या निर्णयात कंपनीच्या पाठिशी आहे, असं त्यांना वाटावं म्हणून हा निर्णय घेण्यात आला. पाळीव प्राण्यांना घरात ठेवताना कंपनी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो हे या धोरणातून त्यांना दाखवायचं आहे. आवडलं का तुम्हाला हा निर्णय? हा निर्णय घेतला आहे. स्विगी या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनी आणि या स्पेशल लिव्ह बद्दल चिफ ह्यूमन रिसोर्स ऑफिस गिरीश मेनन सांगितलंय. 


कोणासाठी असेल हे धोरण?


हे धोरण परमनंट कर्मचाऱ्यांसाठी असून ज्यांच्या घरात पाळीव प्राणी आहे किंवा पाळीव प्राणी पाळण्याचा विचार असेल त्यांना या सुट्ट्या मिळणार आहे. एवढंच नाही तर प्राणी पाळण्याच्या विचारात असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुट्टी मिळणार आहे. त्याशिवाय गरज पडल्यास त्यांना वर्क फ्रॉम होमचीही तरतूद या धोरणात आहे. 


या प्रसंगातही मिळेल सुट्टी


 कर्मचाऱ्यांच्या घरातील सदस्य असलेला पाळीव प्राणी आजारी असल्यास त्यांना सिक लिव्ह टाकता येणार आहे. त्याशिवाय जर त्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास कर्मचाराला दु:खातून सावरण्यासाठीही सुट्टी मिळणार आहे. सुट्टीसंदर्भातील हे नवीन धोरण 11 एप्रिलपासून लागू करण्यात आलंय.