SBI Digital Banking: तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India) असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआय सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असून ग्राहकांना अनेक प्रकारच्या डिजिटल बँकिंग सुविधा पुरवते. एसबीआय मोबाइल बँकिंग वैशिष्ट्यांतर्गत बरेच पर्याय ऑफर करते. यात मोबाईल बँकिंगसाठी अनेक अॅप्स आहेत, जे कॉर्पोरेट ते रिटेल बँकिंगपर्यंतचे प्लॅटफॉर्म प्रदान करतात. तुम्हीही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी इतर कोणत्या सेवा उपलब्ध आहेत ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SBI Internet Banking


एसबीआयचे www.onlinesbi.com या पोर्टलवरून सर्व व्यवहार करता येतात. खात्यांमधून निधी हस्तांतरित करण्याची सुविधा आहे. तसेच एसबीआय शाखेच्या कोणत्याही खात्यात थर्ड पार्टी ट्रान्सफर करता येईल. इतर बँकांच्या खात्यांसह इंटर बँक हस्तांतरण करण्याची सोय आहे. याद्वारे तुम्ही डिमांड ड्राफ्ट जारी करण्यासाठी विनंती करू शकता. नवीन खाते उघडणे, कर्ज खाते बंद करणे, चेकबुक इश्यू करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
इंटरनेट बँकिंगद्वारे केलेल्या व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट मिळवता येतात.


BHIM SBI Pay


BHIM SBI Pay हे  एसबीआयचे यूपीआय अॅप आहे. याद्वारे यूपीआय सुविधा देणाऱ्या सर्व खातेदारांना पैसे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची सुविधा आहे. यावर ऑनलाइन बिल भरणे, रिचार्ज, खरेदी आदी कामेही स्मार्टफोनद्वारे करता येतात.


SBIePay 


स्वतःचे पेमेंट एग्रीगेटर असलेली एसबीआय ही एकमेव बँक आहे. SBIePay वापरकर्त्यांना जलद आणि सुलभ पेमेंट करण्याची सुविधा देते. यामध्ये आणखी अनेक मूल्यवर्धित सेवा उपलब्ध आहेत. यावर इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एनईएफटी, CSCs आणि शाखा पेमेंटद्वारे इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे.


Mobile Banking अंतर्गत एसबीआय आपल्या ग्राहकांना या सुविधा देते


-Yono Lite SBI: रिटेल यूजर्ससाठी हे मोबाइल बँकिंग अॅप आहे. या अॅपद्वारे खातेदार कुठेही, कधीही बँकिंग करू शकतात. डेबिट कार्ड, mPassbook व्यवस्थापित करता येते. QR कोड आधारित पेमेंट करू शकता. स्मार्ट वॉच बँकिंग हे देखील यामध्ये वैशिष्ट्य आहे.


-SBI Quick: एसबीआयने मिस्ड कॉल बँकिंगचे हे नवीन फीचर जारी केले आहे. यामध्ये, खातेधारक पूर्व-निर्धारित कीवर्ड किंवा नंबरसह मिस कॉल किंवा एसएमएस देऊन शिल्लक चौकशी, एटीएम कार्ड ब्लॉक करणे, कार किंवा गृहकर्ज माहितीसह माहिती मिळवू शकतात.


-YONO Business SBI: खातं व्यापर आणि विस्तार यूजर्ससाठी उपलब्ध आहे. कॉर्पोरेट एन्क्वायरर, मेकर आणि अधिकृत भूमिका INB यूजरनेम आणि पासवर्डसह लॉग इन करून वापरल्या जाऊ शकतात.


-SBI Pay: हे BHIM SBI Pay UPI अॅप आहे.  UPI अॅप्सवर खातेधारकांना पैसे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची सुविधा मिळते. तुम्ही ऑनलाइन बिल पेमेंट, रिचार्ज, शॉपिंग इत्यादी देखील करू शकता.


-SBI Secure OTP: हे एक OTP जनरेशन अॅप आहे. एसबीआय इंटरनेट बँकिंग आणि YONO Lite SBI अॅपवर केलेल्या व्यवहारांची पडताळणी करते.


-YONO: YONO हे एसबीआयचे यूनिक अॅप आहे. यूजर्स कोणत्याही एसबीआय ATM, SBI Merchant Point of Sale किंवा ग्राहक सेवा पॉइंट्सवर ATM कार्ड किंवा कोणत्याही पैसे काढण्याच्या स्लिपशिवाय पैसे काढू शकतात.