मुंबई : आजच्या काळात तुम्हाला बरेच लोक ATM Card वापरताना दिसतील. यामुळे पैसे केव्हा ही आणि कुठेही काढणं सोपं झालं आहे. प्रधानमंत्री जन-धन योजना आणि रुपे कार्डमुळे एटीएम आता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहेत. ज्यामुळे लोकांचा बँकेत जाण्याचा वेळ देखील वाचला आहे. तसेच रोख रकमेवरील अवलंबित्व तर कमी झाला आहे. त्यामुळे आपले पैसे अधिक सुरक्षीत राहिले आहेत. कारण आता तुम्हाला कुठलीही वस्तु घेण्यासाठी रोख रक्कम घेऊन जायची गरज नाही. तुम्ही दुकानात कार्डचा वापर करु शकता आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे पैसे चोरी होण्याची शक्यता देखील कमी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता एक छोटा एटीएम कार्ड सर्व काम करते. याशिवाय, एटीएम कार्डसह, असे काही फायदे आहेत, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. माहितीअभावी मोफत उपलब्ध असलेल्या आवश्यक सुविधा वापरण्यापासून लोक वंचित राहतात. चला याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊ.


एटीएम कार्डसह उपलब्ध सेवांपैकी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे विनामूल्य विमा (ATM Card Insurance). होय... बँकेने ग्राहकाला एटीएम कार्ड जारी करताच, ग्राहकाला अपघाती विमा किंवा जीवन विमा मिळतो. मात्र, याबाबत फार कमी लोकांनी माहिती असल्यामुळे फार कमी लोक या विम्यासाठी दावा किंवा क्लेम करतात.


खेड्यातील लोकांना या गोष्टी समजत नाहीत आणि शहराकडील सुशिक्षित लोक यासगळ्याकडे फारसे लक्ष देत नाहीत.


कार्डनुसार तुम्हाला इतके कव्हरेज मिळते


जर एखादी व्यक्ती कोणत्याही Nationalized आणि Non-nationalized बँकेचे एटीएम किमान ४५ दिवस वापरत असेल, तर तो एटीएम कार्डसोबत येणाऱ्या विम्याचा दावा करण्यास पात्र ठरतो. बँका ग्राहकांना विविध प्रकारचे एटीएम कार्ड देतात. एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार त्याच्यासोबत येणारी विम्याची रक्कम ठरवली जाते.


ग्राहकांना क्लासिक कार्डवर 01 लाख रुपये, प्लॅटिनम कार्डवर 02 लाख रुपये, नॉर्मल मास्टर कार्डवर 50,000 रुपये, प्लॅटिनम मास्टर कार्डवर 5 लाख रुपये आणि व्हिसा कार्डवर 1.5-02 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध आहे.


प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत, ग्राहकांना 01 ते 02 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो, ज्यात रुपे कार्ड विमा उघडलेल्या खात्यांवर उपलब्ध आहे.


कोणाला मिळणार हा क्लेम?


जर एटीएम कार्डधारक अपघाताचा बळी झाला आणि एका हाताने किंवा एका पायाने अपंग झाला तर त्याला 50 हजार रुपयांचे संरक्षण मिळते. त्याचप्रमाणे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास, 01 लाख रुपयांचा विमा लाभ उपलब्ध आहे. मृत्यूच्या बाबतीत, कार्डवर अवलंबून, कव्हरेज रु. 01 लाख ते रु. 05 लाखांपर्यंत असते.


एटीएम विम्याचा क्लेम कसा करावा?


एटीएम कार्डसह उपलब्ध असलेल्या विमा क्लेम करण्यासाठी, कार्डधारकाच्या नॉमिनीला संबंधित बँकेकडे अर्ज करावा लागेल. बँकेत एफआयआरची प्रत, हॉस्पिटलमधील उपचाराचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सादर केल्यावर विमा दावा प्राप्त होतो. मृत्यू झाल्यास, कार्डधारकाच्या नामनिर्देशित व्यक्तीने मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर प्रत, आश्रित प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत इत्यादी सादर करणे आवश्यक आहे.