नोटीवर असलेल्या सिक्योरीटी थ्रेडबद्दल `या` गोष्टी तुम्हाला माहित आहेत? लगेच जाणून घ्या
जेव्हाही तुम्ही तुमच्या हातात कोणतीही नोट घेता, सर्वप्रथम तुमच्या हातांतील ती नोट तपासा.
मुंबई : देशात किती नोटा छापल्या जातील हे ठरवण्याचा अधिकार फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेला आहे. आरबीआयने नोटांच्या छपाईसाठी कठोर मानके निश्चित केली आहेत. जेणे करुन बनावट नोटा बाजारात येऊ नयेत. असे असूनही देशात बनावट नोटा फिरतात. ज्यामध्ये आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसाला त्यामधील फरक समजत नाही. परंतु आरबीआय अनेक प्रकारच्या सुरक्षा मानकांची काळजी घेते. जेणेकरून खऱ्या आणि बनावट नोटांमध्ये फरक करता येईल. यासाठी, आरबीआयने जारी केलेल्या सर्व नोटांमध्ये सुरक्षा धागा देखील एक सुरक्षा मानक आहे.
जेव्हाही तुम्ही तुमच्या हातात कोणतीही नोट घेता, सर्वप्रथम तुमच्या हातांतील ती नोट तपासा. तुम्हाला सुरक्षा धाग्यावर काही कोड लिहिलेले दिसतील. बनावट नोटा टाळण्यासाठी सुरक्षेचा धागा वापरण्याची कल्पना प्रथमच इंग्लंडमध्ये निर्माण झाली. 1848 साली त्याचे पेटंटही झाले. एक वर्षानंतर त्याचा वापर सुरू झाला.
इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी (IBNS) नुसार, बँक ऑफ इंग्लंडने 1948 मध्ये पहिली मेटल-स्ट्रीप चलन जारी केले. जेव्हा ती नोट प्रकाशात दिसली तेव्हा त्यावर एक काळी रेषा दिसत होती. मात्र, या युक्तीनेही बनावट नोटांचा व्यवसाय थांबला नाही. 1984 मध्ये, बँक ऑफ इंग्लंडने 20 पाउंडची नोट जारी केली ज्यामध्ये तुटलेल्या धातूच्या धाग्यांसारखे लांब डॅश होते.
त्यानंतरही फसवणूक करणाऱ्यांनी त्यावर तोडगा शोधून काढला. बनावट नोट बनवणाऱ्यांनी तुटलेल्या अॅल्युमिनियमच्या धाग्याचे सुपर गोंद वापरण्यास सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, जपानमधून बनावट नोटा येण्याच्या भीतीमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या नोटांवर सुरक्षा धागा वापरण्यास सुरुवात केली.
त्याचवर्षी, भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 2000 मध्ये 1000 रुपयांच्या धाग्याच्या नोटाही जारी केल्या. मग त्या धाग्यावर हिंदीमध्ये भारत, 1000 आणि RBI असे छापले गेले.
आता ही तुटक धातूची पट्टी 2 हजार रुपयांच्या नव्या नोटांवर दिसते. त्यावर हिंदीमध्ये भारत आणि इंग्रजीत RBI असे लिहिले गेले आहे. परंतु हे प्रिंट उलट केले असते. त्याचप्रमाणे, आता प्रत्येक नोटीला एक सुरक्षा धागा आहे. जेणेकरून लोक खऱ्या आणि बनावट मध्ये सहज फरक करू शकतील.