Research About Types and Population of Ants on Earth: पृथ्वीतलावर मानवाव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या प्रजाती आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुंगी. पृथ्वीवर किती मुंग्या आहेत? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला उत्तर देता येईल का? पण संशोधकांच्या टीमने अशक्यप्राय प्रश्नाचं उत्तर शोधलं आहे. हाँगकाँग विद्यापीठाच्या एका विभागाने जगभरातील मैदानांना भेट देऊन आणि मुंग्यांवर संशोधन पूर्ण केले आहे. संशोधकांनी मुंग्यांच्या नेमक्या संख्येच्या आसपासची आकडेवारी सांगितली आहे. या संशोधनामागे या टीमची मेहनतही समोर आली आहे. या संशोधनानुसार पृथ्वीवर दोन लाख खरब किंवा दोन कोटी अब्ज मुंग्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंग्यांची एकूण संख्या संख्येत लिहायची झाली तर 20000 दशलक्ष दशलक्ष किंवा दोनच्या नंतर 16 शून्य (20,00,00,00,00,00,00,000) इतकी आहे. मुंग्यांच्या 15700 हून अधिक प्रजाती आणि उपप्रजाती आहेत. नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेजच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात सांगितलं आहे की, शास्त्रज्ञांनी जगभरातील सुमारे 500 मुंग्यांचं विश्लेषण केले आहे.


Parle-G मधला 'G' म्हणजे Genius नाही, जाणून घ्या काय आहे अर्थ 


मुंग्या मानवासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मुंग्या हा निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहे. अहवालानुसार, जगभरातील मुंग्यांमध्ये एकूण 12 दशलक्ष टन कार्बनचे बायोमास आहे. जंगले, वाळवंट, गवताळ प्रदेश आणि शहरांसह सर्व खंडांवरील प्रमुख अधिवासांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. मुंग्या जमिनीत वायुवीजन करतात, बिया विखुरतात, इतर प्राण्यांसाठी अधिवास निर्माण करतात आणि अन्नसाखळीचा एक महत्त्वाचा भाग बनवतात.