Real Meaning of 'G' in Parle-G: चहा आणि पार्ले जी बिस्किटचं एक वेगळंच नातं आहे. स्वस्त आणि मस्त चव असलेलं पार्ले जी (Parle-G) बिस्किटचे सर्वांच्याच पसंतीला उतरलं आहे. 90 च्या दशकातील मुलांना पार्ले जी बिस्किटचा सुवर्णकाळ आठवल्याशिवाय राहणार नाही. त्या काळात पार्ले जी बिस्किटची जाहिरातही गाजली होती. पॅकेटवर छापलेल्या मुलीच्या चित्राबद्दलही अनेक किस्से सांगितले जातात. आजही पार्लेजी बिस्किटची चव कायम आहे. असं सगळं असताना Parle-G मधल्या G चा नेमका अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. काही जणांच्या मते G म्हणजे Genius असा होतो. पण त्याचा अर्थ Genius असा नाही, जाणून घेऊयात नेमका अर्थ
स्वातंत्र्यापूर्वी पार्ले-जी बिस्किटचे नाव ग्लुको बिस्किट होते. दुसऱ्या महायुद्धात भारतीय आणि ब्रिटीश सैनिकांचे हे आवडते बिस्किट होते. पण स्वातंत्र्यानंतर ग्लुको बिस्किटांचे उत्पादन बंद झाले. वास्तविक, बिस्किट तयार करण्यासाठी गव्हाचा वापर केला जात होता आणि त्यावेळी देशात अन्न संकट आले होते. त्यामुळे उत्पादन थांबवावे लागले होते. मात्र, बिस्किटाचे उत्पादन पुन्हा सुरू झाल्यावर अनेक कंपन्या स्पर्धेत उतरल्या. विशेषत: ब्रिटानियाने ग्लुकोज-डी बिस्किटांच्या माध्यमातून संपूर्ण बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ग्लुको बिस्किट पुन्हा लाँच करण्यात आले.
DTH अँटेनाचा आकार गोल का असतो? जाणून घ्या या मागचे कारण
ग्लुको बिस्किटाला 'पार्ले-जी' असे नाव देण्यात आले आणि मुखपृष्ठावर एका लहान मुलीचा फोटोही लावण्यात आला. पार्ले हे नाव मुंबईच्या विले-पार्ले या भागावरून पडलेले आहे. या भागात बिस्किटाचा कारखाना होता. Parle-G मधला 'G' म्हणजे 'ग्लुकोज'. वास्तविक, पार्ले-जी म्हणजे ग्लुको बिस्किट. मात्र, 2000 साली 'G' म्हणजेच 'Genius'ची जाहिरात करण्यात आली.