मुंबई :  घरगुती आणि व्यावसायिक उपयोगासाठी गॅस सिलेंडरचा (Gas cylinder) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या गॅस सिलेंडरचे दरमहिन्याला दर (Gas Cylinder Rate)  बदलतात.  सातत्याने वाढणाऱ्या दरामुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आले आहेत. सिलेंडर घेताना आपण त्याचं वजन योग्य आहे की नाही, सिल बरोबर आहे की नाही, याची खात्री करतो. मात्र याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याबाबत आपल्याला माहित नाही. सिलेंडरवर जर नीट पाहिलं तर त्यावर काही आकडे (Cylinder Code) असतात. या आकड्यांचा नक्की अर्थ काय, त्याचा ग्राहकाशी काय संबंध असतो, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. (do you know meaning about gas cylinder code a b c  know intresting facts)


अंकांचा अर्थ काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिलेंडरच्या वरील बाजूस अक्षरं आणि काही अंक असतात. या अक्षर आणि अंकाद्वारे सिलेंडरची एक्सपायरी डेट सांगितली जाते, जे कोडमध्ये लिहिलेलं असतं. सिलेडंरवर असलेल्या ए, बी, सी आणि डी चा संबंध महिन्याशी आहे. तर अंकांचा संबंध हा वर्षासह आहे. गॅस कंपन्यांकडून वर्षातील 12 महिन्यांची विभागणी ही प्रत्येकी 4 अक्षरात करण्यात आली आहे.


उदाहरण म्हणजे जर सिलेंडरवर A लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असा होता. B म्हणजे एप्रिल, मे आणि जून.  C म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि D म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, असं या अक्षरांचा महिन्याशी संबंध आहे.


फोटोद्वारे समजून घेऊ



वरील फोटोत 2 सिलेंडर दिसत आहेत. या सिलेंडरवर  B.13 आणि A.11 असे कोड आहेत. याचा अर्थ असा की हा सिलेंडर एप्रिल, मे आणि जून महिन्यातील आहे तर वर्ष 2013 आहे. त्यानुसार या सिलेंडरची एक्सपायरी डेट ही 2013 आहे. तसंच दुसऱ्या सिलेंडरवर A.11 लिहिलेलं आहे. A म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्च महिना. तर 11 म्हणजे 2011 वर्ष. या तारखेनंतर खबरदारी आणि सुरक्षेच्या दृष्टीने सिलेंडरची टेस्टिंग केली जाते. त्यामुळे डिलीव्हरी घेताना सिलेंडरवरील कोड काळजीपूर्वक पहा आणि सावध रहा.