मुंबई :  वास्तुशास्त्रात आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचं एक विशेष महत्व सांगितला आहे. गोष्टींच्या असण्यामागे, त्याच्या आकारामागे, त्याच्या रंगाचा काही ना काही अर्थ हा नक्कीच असतं. तसेच वास्तुशास्त्रात शुभ आणि अशुभ गोष्टींना खूप महत्व असतं. वास्तुशास्त्र आपल्या फक्त जागा किंवा दिशाबद्दलच सांगत नाही तर आपल्याला संख्याबद्दल देखील सांगतं. तुम्ही कधी फिरायला किंवा हॉटेलमध्ये गेलात तर तुम्ही हे कधी नोटीस केलं आहे का, की बहुतांश हॉटेलमध्ये 13 क्रमांकाची खोली किंवा 13 वा मजला नसतो. (हे सगळ्यास हॉटेलमध्ये होत नाही, परंतु बहुतांश भागात असतं) कारण बरेच लोक या क्रमांकाला अशुभ मानतात.


13 ही संख्या पाश्चात्य संस्कृतीत अशुभ मानली जाते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तविक, पाश्चात्य देशांमध्ये 13 हा आकडा खूप अशुभ मानला जातो. जे पाहता आता भारतातील अनेकांनी याचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. अनेक हॉटेल्समध्ये रूम नंबर 12 नंतर थेट रूम नंबर 14 असतो. परंतु तुम्हाला फार कमी ठिकामी 13 क्रमांक दिसेल.


परंतु हे समजून घ्या की, असे प्रत्येक हॉटेलमध्ये होत नाही, तर काही ठरावीक हॉटेलमध्ये ही मान्यता आहे.


आता 13 नंबर हा अशुभ का मानला जातो, असा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. चला तर मग यामागचं कारण आपण समजून घेऊ.


धर्माशी संबंध


परदेशात 13 व्या क्रमांकाबाबत लोकांच्या मनात अनेक भीती आहेत. असे मानले जाते की, ज्या व्यक्तीने प्रभु येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला, तो त्यांच्यासोबतच्या तेराव्या खुर्चीवर बसला होता. या कारणास्तव तिथले लोक 13 नंबरला चांगला मानत नाहीत. याच कारामुळे 13 नंबरची भीती पाश्चात्य संस्कृतीत इतकी आहे की, तेथील इमारतीतही 12व्या मजल्यानंतर थेट 14वा मजला बांधला जातो.


13 क्रमांकाची खोली किंवा मजला भारतातही बऱ्याच भागात नाही


अनेक परदेशी लोक भारतात भेट देण्यासाठी येतात. अशा स्थितीत या लोकांचा विश्वास लक्षात घेता भारतात देखील अनेक हॉटेल्समध्ये 13 क्रमांकाची खोली नाही.


(विशेष सूचना :  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)