तुम्हाला स्वप्नात `या` गोष्टीत दिसतात? जाणून घ्या `या` स्वप्नांचा अर्थ
स्वप्नांची दुनिया तुम्हाला बरंच काही सांगून जाते, आपल्याला पडणारी स्वप्न आपल्या आयुष्याशी निगडित
Meaning of Dreams : माणसांना स्वप्न का पडतात याबाबत अजूनही सखोल संशोधन सुरु आहे. अनेक वैज्ञानिक (Scientist) यामागील नेमकं आणि अचूक कारण काय, नेमकी ही प्रक्रिया कशी होते, याबाबत शोध घेतायत. आपल्याला पडणारी स्वप्न आपल्या आयुष्याशी निगडित असतात असं बोललं जातं. म्हणूनच तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांना हलक्यात घेऊ नका किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नका, असं स्वप्नशास्त्राचा (Dream Science) अभ्यास करणारे सांगतात. अनेकदा आपल्यापैकी अनेकांना काही प्रकारची स्वप्न पडतात. आपण आपल्या घरच्यांसोबत किंवा मित्रांसोबत आपल्याला पडलेली स्वप्न शेअर देखील करतो. या स्वप्नांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. अशाच काही स्वप्नांचा अर्थ काय होतो हे, जाणून घेऊया. याबाबतची माहिती अतिशय इंटरेस्टिंग आहे.
तुम्ही तुमच्या शाळेत आहात
तुम्ही स्वप्नात तुमच्या शाळेत गेलेलं पाहिलं असेल तर तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाणार आहे. अशा प्रकारचं स्वप्न तुम्हाला भविष्यात सफलता मिळेल असे संकेत देत असतात. सध्याच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात अनेकांना आपलं शालेय जीवन आठवतं.
पार्टनर देतोय धोका
तुमचा पार्टनर तुम्हाला धोका देतोय असं जर तुम्हाला स्वप्नात पाहायला मिळत असेल, तर हे चिंतेचं कारण असू शकतं. अशाप्रकारची स्वप्न खऱ्या आयुष्यात तुमच्या नात्यांमधील विश्वासाच्या कमतरतेला दर्शवत असतात. अशात तुमच्या दोघांमध्ये कुणी तिसराच आहे, असंही होऊ शकतं.
स्वप्नात पैसे दिसणं
जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात खूप पैसे दिसत असतील तर यामागील तर्क वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. स्वप्नात पैसे दिसणे म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात सफलता हवी आहे.
स्वप्नात स्वतःला उडताना पाहणं
जर तुम्ही स्वप्नात स्वतःला उडताना पाहिलं तर याचे दोन अर्थ निघतात. उडताना तुम्ही आनंदी असाल, तर तुमच्या जीवनात पुढे येणाऱ्या अनुभवांना तुम्ही आनंदाने, उत्साहाने सामोरं जाणार असा अर्थ निघतो. मात्र उडताना तुम्ही घाबरले असाल, तर मात्र तुम्ही भविष्यात येणाऱ्या अनुभवांबाबत खूप चिंतीत आहात असा अर्थ निघतो.
स्वप्नात देवाचं दर्शन होणं
स्वप्नात देवाचं दर्शन होणं अतिशय शुभ मानलं जातं. याचा अर्थ देव तुम्हाला धर्माच्या रस्त्यावर चालण्याचा संदेश देतायंत. तुम्ही संकटात असताना तुम्हाला देवाचं स्वप्नात दर्शन झाल्यास तुम्हला धैर्य राखण्याचे संकेत मिळतायत असा त्याचा अर्थ निघतो.