मुंबई : एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहून त्याचा स्वभाव कळणे तसे अवघड आहे. परंतु तुम्हाला माहितीय आहे का, की चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे तुम्ही लोकांचा स्वभाव ओळखू शकता. हो तुम्ही बरोबर एकलंय, माणसाचा चेहरा अंडाकृती आहे की, चौकोनी आहे, हे पाहून त्याचा स्वभाव कसा आहे हे आपण ओळखू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी 17 हजारांहून अधिक चेहऱ्यांवर संशोधन करून हे सिद्ध केले आहे. संशोधनादरम्यान, अंडाकृती आणि चौकोनी आकाराच्या चेहऱ्यांची तुलना करण्यात आली आणि जे निष्कर्ष समोर आले ते धक्कादायक होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे संशोधन करणाऱ्या न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील संशोधकांचे म्हणणे आहे की, संशोधनाच्या आकडेवारीवरून कोण जास्त आक्रमक आहे, हे दिसून येते.
 
चेहऱ्याचा मानवी स्वभावाशीही संबंध असू शकतो की नाही हे समजून घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी 17 हजारांहून अधिक चेहऱ्यांवर संशोधन केले. या लोकांच्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रावर अभ्यास करण्यात आला. त्यात 6 ते 93 वयोगटातील स्त्री आणि पुरुष दोघांचाही समावेश होता.


संशोधनात समाविष्ट केलेल्या फोटोमधील चेहऱ्यांच्या लांबी आणि रुंदीचे प्रमाण नोंदवले गेले. तांत्रिक भाषेत त्याला FWHR म्हणजेच फेशियल विथ टू हाईट रेशो असे म्हणतात. यानंतर लोकांना या चेहऱ्यांना रेट करण्यास सांगण्यात आले.


परिणामी, चौरस-आकाराचे चेहरे असलेल्या लोकांचे वर्णन अधिक आक्रमक आणि संतप्त म्हणून केले गेले. त्याच वेळी, अंडाकृती चेहरे असलेल्या लोकांना कमी आक्रमक म्हणून वर्णन केले गेले आहे.


संशोधनादरम्यान चेहऱ्याचा आकार आणि व्यक्तीची आक्रमकता यांचा काय संबंध आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


चौकोनी चेहरा असलेले लोक जास्त रागावलेले का असतात?


डेलीमेलच्या रिपोर्टमध्ये संशोधकांचे म्हणणे आहे की, चौकोनी चेहरा असलेले लोक शारीरिकदृष्ट्या अधिक शक्तिशाली असतात, हे त्यांच्या रागाचे सर्वात मोठे कारण असू शकते. यामध्येही महिलांपेक्षा पुरुषांमध्ये राग लवकर येतो.


संशोधकांचे म्हणणे आहे की, त्यांनी चेहऱ्यांच्या बाबतीत आणखी एक संशोधन केले. त्यामध्ये त्यांना असे समोर आले आहे की, ज्यांच्या चेहऱ्याची लांबी आणि रुंदी जास्त असते, असे लोक जास्त रागावतात. अंडाकृती आणि चौरस आकाराच्या चेहऱ्यांची तुलना केल्यास, सरासरी क्षेत्रफळ चौरस आकाराच्या चेहऱ्यांचे जास्त असते. अशा प्रकारे हे सिद्ध झाले की, चौरस चेहरे असलेले लोक अधिक आक्रमक असतात.


शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोण जास्त आक्रमक आहे, हे संशोधनात त्यांना सिद्ध झाले आहे, मात्र त्याचे नेमके कारण अद्याप मिळालेले नाही.