मुंबई : केंद्राच्या 'राष्ट्रीय वैद्यकीय आयोग' विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील डॉक्टर शनिवारी संपावर जाणार आहेत. 'राष्ट्रीय वैद्यक परिषद' बरखास्त करुन 'राष्ट्रीय वैद्यकीय आयोग' स्थापण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतला आहे. हे विधेयक सभागृहात चर्चेसाठी ठेण्यात येणार असल्यानं डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. संपात साधारण तीन लाख डॉक्टर्स सहभागी होतील. 


वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतंय. नव्या विधेयकानुसार वैद्यकीय क्षेत्रावर नियंत्रण आणि वैद्याकीय संस्थांचं मूल्यमापन करण्यासाठी चार स्वायत्त मंडळं स्थापन करण्यात येणार आहेत. डॉक्टर, वैद्यकीय संस्थांचं मूल्यमापन आणि डॉक्टरांची नोंदणी, त्यांचे नुतनीकरण ही काम त्याअंतर्गत पार पडतील. या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य शासननियुक्त असतील... तर इतर पाच सदस्य निवडणुकीच्या माध्यमातून नियुक्त करण्यात येतील... तर १२ सदस्य पदसिद्ध असतील.