मुंबई : कोरोनाच्या महामारीमध्ये डॉक्टर्स आणि इतर आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेसाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे एक दिवस डॉक्टरांच्या कामाला समर्पित म्हणून असायला हवा. आजचा दिवस म्हणजेच १ जुलै देशातभरात डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात डॉक्टर्स डे आपआपल्या देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. जसे की ब्राझिल १८ ऑगस्ट, ईराण -२३ ऑगस्ट, अमेरिका - ३० मार्च होय.


१ जुलै रोजीच भारतात डॉक्टर्स डे का साजरा करतात?


भारतात १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. हा दिवस देशातील महान चिकित्सक आणि प.बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉयच्या आठवणीत साजरा केला जातो.


त्यांचा जन्म १ जुलै 1882 रोजी झाला होता तर 1962 मध्ये वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. देशातील महान डॉक्टरांमध्ये त्यांची गणना होते. एवढेच नाही तर, जगभरात आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.


बिधान चंद्र रॉय यांना 1961 साली देशातील सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या सन्मानातच भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स डे प्रत्येक १ जुलै रोजी साजरा करण्यात येतो.