देशभरातील डॉक्टरांचा उद्या एकदिवसीय संप
एनएमसी बिलाच्या विरोधात आयएमए डॉक्टरांनी उद्या एकदिवसीय संप पुकारलाय. केंद्र सरकार आणत असलेल्या एनएमसी विधेयकातील तरतुदींना आयएमएचा विरोध आहे.
नवी दिल्ली : एनएमसी बिलाच्या विरोधात आयएमए डॉक्टरांनी उद्या एकदिवसीय संप पुकारलाय. केंद्र सरकार आणत असलेल्या एनएमसी विधेयकातील तरतुदींना आयएमएचा विरोध आहे.
या बिलामुळे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजे एमएमसीच्या ऐवजी नँशनल मेडिकल कमिशन अर्थात एनएमसी अस्तित्वात येणार आहे.
याला विरोध म्हणून देशभरातील ३ लाख डॉक्टर आपली खासगी प्रँक्टीस बंद ठेवून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील ४० लाख डॉक्टरही प्रँक्टीस बंद ठेवणार आहेत.