मुंबई : तुम्ही स्प्राइटची बाटली दुकानातून विकत घेतली असेल, जिचा आइडियल रंग हा हिरवा आहे आणि स्प्राइट बाजारात आल्यापासून तुम्ही त्याचा रंग हिरवा असल्याचे पाहिले असेल. परंतु आता या बाटलीचा रंग बदलणार आहे. हो ही बाटली आता ट्रांस्परंट होणार आहे. अमेरिकन कोका-कोला कंपनीने आपल्या स्प्राईटच्या हिरव्या बाटलीचा रंग बदलण्याची तयारी देखील केली आहे. लवकरच त्याचा रंगही भारतातील इतर बाटल्यांप्रमाणे पारदर्शक दिसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्प्राइट पहिल्यांदा 1961 मध्ये बाजारात आणले गेले होते, तेव्हापासून त्याच्या बाटलीचा रंग हिरवा राहिला आहे. १ ऑगस्टपासून स्प्राईटची हिरव्या रंगाची बाटली बाजारात विकणार नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. फक्त स्प्राईटच नाही तर इतर पेय पदार्थ देखील पारदर्शक बाटल्यांमध्येच आतापासून सेल केले जाईल असं देखील सर्वत्र म्हटलं जात आहे.


पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ते रंग बदलत असल्याचा कंपनीचा दावा आहे. अशा परिस्थितीत बाटली प्लास्टिकचीच राहणार, मग रंग बदलून किती बदलणार? असा प्रश्न निर्माण होतो.


बाटली पारदर्शक का होणार?


कंपनीचे म्हणणे आहे की, स्प्राईटची ही नवीन ट्रांस्परंट बाटलीचा सेल उत्तर अमेरिकेतून सुरू होईल. यानंतर ते जगातील इतर देशांमध्ये नेले जाईल. सध्या स्प्राईट बाटलीचा हिरवा रंग ही त्याची ओळख बनली आहे. हे जगात इतके लोकप्रिय आहे की ते जगातील तिसरे सर्वाधिक सेवन केले जाणारे कोलड्रिंक बनले आहे. त्याच वेळी, कोका-कोला हे कंपनीचे दुसरे सर्वाधिक विकले जाणारे पेय आहे.


बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, बाटलीचा रंग बदलण्यामागे एक मोठे कारण आहे. वास्तविक हिरवी बाटली पर्यावरणासाठी अधिक हानिकारक आहे कारण तिचा पुनर्वापर करता येतो, परंतु त्यापासून इतर पारदर्शक बाटल्या बनवता येत नाहीत. त्यामुळे अशा बाटल्यांचा कचरा वाढत असून त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे.


स्प्राईटने पारदर्शक बाटल्यांमध्ये आपला सेल सुरुवात केल्यानंतर त्या बाटल्यांचा पुनर्वापर करणे सोपे होईल आणि देशातील तसेच जगातील वाढता कचरा कमी करता येईल.


याचे कारण असे की, जेव्हा प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये रंग जोडला जातो तेव्हा ते रिसायकल करणे कठीण होते.


सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले तर अशा बाटल्या कचऱ्यात जमा केल्या जातात तेव्हा त्या वेगळ्या करण्यासाठी बराच वेळ जातो, तर इतर पारदर्शक बाटल्या एकाच वेळी रिसायकल करणे सोपे जाते, त्यामुळे ही कसरतही केली जात आहे. याचे एक कारण म्हणजे बाजारात हिरव्या बाटल्या असलेली कोणतीही उत्पादने नाहीत, त्यामुळे इतर हिरव्या बाटल्या बनवण्यासाठी त्यांचा पुनर्वापर केला तरी त्यांना खरेदीदार नाही. त्यामुळे त्यांची विक्री करूनही पैसे मिळू शकत नाहीत.