`या` फोटोला साधा-सुधा समजू नका, याचं उत्तर देताना भल्याभल्यांना फुटलाय घाम
लोक हा फोटो पाहून लोक योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सोशल मीडियावर आपल्या मित्रांना टॅग करून प्रश्नाचे योग्य उत्तर विचारत आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर दररोज नवीन फोटो व्हायरल होत असतात, जे ऑप्टीकल इल्यूजनशी संबंधीत असतात. ज्याला पाहिल्यामुळे तुम्हाला दोन वेगवेगळ्या गोष्टींचा भास होईल. आता असाच एक फोटो समोर आला आहे. ज्याला पाहून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तसे पाहाता तुम्हाला हा फोटो नॉर्मल वाटेल परंतु तो नॉर्मल नाही. यामध्ये तुम्हाला दोन वेगवेगळ्या रंगाचे बॉक्स दिसत आहेत. ज्यामध्ये एक रंग आकाशी आहे आणि दुसरा वांगी रंग, म्हणडेच वायलेट आहे.
आता तुम्हाला हा फोटो नीट पाहून सांगायचं आहे की, या दिसणार्या रेषा सरळ आहेत की वाकड्या? सुरुवातीला पाहिल्यावर लोकांना या ओळी सरळ वाटतात, पण जेव्हा लोक या रेषा काळजीपूर्वक पाहतात तेव्हा त्यांना या रेषा वाकड्या किंवा वर-खाली दिसतात.
हा फोटो खूपच गोंधळून टाकणारा आहे. ज्यामुळे तुम्हाला डोळ्यात तेल घालून या फोटोकडे नीट पाहावं लागणार आहे.
लोक हा फोटो पाहून योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सोशल मीडियावर आपल्या मित्रांना टॅग करून प्रश्नाचे योग्य उत्तर विचारत आहेत. लोक आपल्या मित्रांचीही अशा प्रकारे मेंदूची परीक्षा घेत आहेत. परंतु तरीही बहुतेक वापरकर्ते कोड्याचे अचूक उत्तर देऊ शकत नाहीत.
खरंतर या फोचटोमधील या रेषा सरळच आहे. परंतु या फोटोत निळ्या रंगाच्या दोन वेगवेगळ्या छटांमुळे हा फोटो आभासी वाटत आहे. हा फोटो अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो समजून घेण्यासाठी लोकांना खूप मेंदूचा व्यायाम करावा लागत आहे.