Brothers And Sisters Death: रस्त्यावरील भटक्या तसेच पाळीव कुत्र्यांचा रोज अनेकांना त्रास होत असतो. कधी ते गाडीखाली आल्याने अपघात घडतो तर कधी माणसांच्या लागल्याने अडचणी वाढतात. कुत्र्यांमुळे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामध्ये कुत्र्यापासून वाचायला गेल्या भावा-बहिणीला आपला जीव गमवावा लागला आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये ही दुर्देवी घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोधपूरच्या माता का थान विभागात असलेली शाळा सुटल्यावर भाऊ बहिण घरी जात होते. अनन्या आणि युवराज सिंह अशी या भावा बहिणीचे नाव आहे. आर्मी चिल्ड्रन स्कूलमध्ये अनन्या पाचवी तर युवराज सिंह सातवी इयत्तेत शिकत होता. हे दोघे आपल्या 3 मित्रांसोबत मिळून घरी परतत होते. इतक्यात रस्त्यावरील काही कुत्रे त्यांच्याजवळ जाऊन भूंकू लागले आणि मुलांच्या मागेल लागले. कुत्र्यापासून वाचण्यासाठी भावा-बहिणीने पळ काढला. पळता पळता 3 मुले ते दोघे थेट रेल्वे ट्रॅकवर पोहोचली. इतक्यातच ट्रेन आली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनन्या आणि युवराज नात्याने भाऊ-बहिणी होते. या घटनेची माहिती त्यांच्या पालकांना देण्यात आली. अनन्याचे वडील प्रेमसिंह आणि इतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. मुलांचे मृतदेह पाहून पालकांनी टाहो फोडला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 


कुत्र्याच्या मालकावर कारवाईची मागणी 


अनन्याचे वडील प्रेम सिंह यांनी पेट डॉग्सचा माल ओमप्रकाश राठी याच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. ओमप्रकाश राठीचा एक कुत्रा जर्मन शेफड आणि दुसरा पामेलियन ब्रीडचा होता. या घटनेनंतर नगर पालिकेने कुत्र्यांना पकडले आहे. यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. 


नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती जोधपूरचे एडीसीपी नजीम अली यांनी माध्यमांना दिली.