कोलकाता शहरात कुत्र्याचं मटण...अफवा की वास्तव
मटण खाणाऱ्यांना आक्षेप हा आहे की, हे नेमकं मटण कशाचं आहे, कुत्र्याचं तर नाही ना?
कोलकाता : कोलकाता शहरात सध्या नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण ५० टक्के कमी झालं आहे. मटण खाणाऱ्यांना आक्षेप हा आहे की, हे नेमकं मटण कशाचं आहे, कुत्र्याचं तर नाही ना? कोलकाता शहरात ८० टक्के लोक मांसाहारी आहेत. पण ते प्रमाण निम्म्याने घटलं आहे. यामागील कारण देखील तसंच आहे, कारण पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एक मोठं रॅकेट शहरात शोधून काढलं आहे. खरं तर टॅक्सीचं चाक चिखलात रूतल्यामुळे या मोठ्या घटनेचा पर्दाफाश झाला आहे. ही घटना वेगळी होती आणि अफवा काही वेगळीच पसरली. त्यामुळे शहरात नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्याच कमी झाली. अशी कोणती अफवा होती ज्यामुळे कोलकाता शहरात नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्याच घटली.
मेलेल्या जनावरांचं मास एक रॅकेट शहरात विकत होतं
मेलेल्या जनावरांचं मास एक रॅकेट शहरात विकत असल्याचं पोलिसांनी उघड केलं, यानंतर अशी अफवा पसरली की यात कुत्र्याचं आणि मांजरीचं देखील मास असू शकतं. यानंतर मात्र ही अफवा अशी पसरली की थांबण्याचं नाव घेत नाहीय.
टॅक्सीचं चाक चिखलात रूतलं आणि
स्थानिक पोलिसांनी याविषयी माहिती देताना म्हटलं आहे. कोलकाताच्या बजबज भागात, डम्पिंग ग्राऊंडमधून मागील आठवड्यात एक टॅक्सी निघाली आणि तिचं टायर चिखलात फसलं. तेव्हा टॅक्सीच्या डिक्कीत काही पाकिट होती, जी वजनदार असल्याने बाहेर काढण्यात आली. मात्र आजूबाजूच्या लोकांना त्याचा संशय आला, गाडीत असणाऱ्या लोकांना विचारलं तर, त्यांनी सांगितलं की, डम्पिंग ग्राऊंडमधील मेलेल्या जनावरांचं हे मास आहे ,ते यात विक्रीसाठी शहरात जातंय.
२० टन मेलेल्या जनावरांचं मास जप्त
ही बातमी वाऱ्यासारखी कोलकाता शहरात पसरली, यानंतर पोलिसांना जाग आली, त्यांनी सेन्ट्रल कोलकात्यात मोठ्या कोल्ड स्टोरेजवर धाडी टाकल्या, त्यात २० टन मेलेल्या जनावरांचं मास जप्त करण्यात आलं.
मेलेल्या जनावरांचं मास केमिकलने धुतलं जात होतं
कोलकाता शहरातील ही गँग मास साफ करून, केमिकलने धुतल्यावर फ्रेश चिकन किंवा मटणासोबत मिसळून विकत होती. स्वस्त दरात हे चिकन-मटण विकलं जात होतं, या प्रकरणी सुरूवातीला १८ लोकांना अटक करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी चौकशी अधिक बारकाईने सुरू केली आहे.
शहरात नॉनव्हेज खाणाऱ्यांचं प्रमाण ५० टक्के घटलं
यानंतर लोकांमध्ये मटण आणि चिकनविषयी चीड निर्माण होणे स्वाभाविक होतं. यानंतर कोलकात्यातील प्रसिद्ध हॉटेल्समध्ये देखील नॉन व्हेजची मागणी घटली. कोलकाता मुंबई प्रमाणे स्ट्रीट फूडसाठी फेमस आहे. येथे अनेक पदार्थ कमी किमतीत, पण चविष्ठ मिळण्याची ठिकाणं आहेत.
मात्र या घटनेनंतर लोकांमध्ये भीती तयार झाली. स्थाविक हॉटेल असोसिएशन देखील याबाबतीत चिंतेत आहे तेव्हा असोसिएशनती संबंधित लोकांनी, मीडियाला माहिती देताना सांगितलं रजिस्टर्ड मीट वेंडर्सकडूनच मटण किंवा चिकन खरेदी करा. यामुळे आता शहरात असं झालं आहे की, लोक सीफूड किंवा मासे खाण्यासाठी पसंती देत आहेत.
लोकांनी म्हटलंय की. कधी वाटत नव्हतं या शहरात मांस सुद्धा असं भेसळ करून विकलं जाईल, आम्ही स्ट्रीट फूड पॅक करून घरी आणून खात होतो, आता आम्ही व्हेज फूडलाच चॉईस करतो.