मुंबई : इंटरनेटवर एक असा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. एकीकडे तुम्ही कुत्र्यांचा गोंडसपणा पाहिला असेल, तर दुसरीकडे तुम्ही त्यांच्या आक्रमक रूपाबद्दलही ऐकले असेल. अनेकांनी हे अनुभवलं देखील असतं, शक्यतो रात्रीच्यावेळी कुत्रे हे लोकांच्या पाठी लागतात किंवा त्यांच्या अंगावर धावून जातात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ देखील त्यासंदर्भातीलच आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीच्या मागे एक-दोन नाही तर जवळ-जवळ 10 ते 15 कुत्रे लागले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा आला असेल. कारण इतक्या कुत्र्यांनी अटॅक केल्यानंतर यामधून वाचणं हे फारच कठीण आहे. यामध्ये एखादा व्यक्ती वाचण्याची अपेक्षा सोडून देईल, परंतु हा तरुण मात्र त्यांच्यासोबत शेवटपर्यंत लढत राहिला.


पुढे या तरुणासोबत काय घडलं माहित नाही. परंतु या तरुणाने ज्यापद्धतीने आपला जीव वाचवला आहे, त्यामुळे त्याच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या सर्वाधीक ट्रेंड होत आहे. या तरुणासोबत जे घडलं ते बऱ्याच लोकांसोबत घडतं, त्यामुळे अशा वेळी काय करावे, हे पाहण्यासाठी देखील कादाचित लोक हा व्हिडीओ पाहात असावे.


या व्हिडीओला लोकांकडून खूप शेअर, लाईक्स आणि कमेंट्स केल्या जात आहेत.