...तर डोकलाम वाद थांबला नसता: राजनाथ सिंह
भारत आता एक जगात ताकदवान देश बनला आहे. भारत जर पहिल्यासारखा कमजोर राहिला असता तर, चीनसोबतचा डोकलाम वाद कधीही थांबला नसता, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.
बंगळुरू : भारत आता एक जगात ताकदवान देश बनला आहे. भारत जर पहिल्यासारखा कमजोर राहिला असता तर, चीनसोबतचा डोकलाम वाद कधीही थांबला नसता, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.
संपूर्ण देश जाणतो की, सरकारने डोकलाम वाद प्रकरण कसे हाताळले. भारत आणि चीन हा संघर्ष चिघळेल असे जगभरातील अनेकांना वाटत होते. पण, तसे घडले नाही. भारत जर कमजोर असता तर, खरोखरच भारताला डोकलाम वादावर तोडगा काढता आला नसता. पण, देश मजबूत झाला आहे. हा प्रश्न सुटू शकला. दरम्यान, भारताचा आणखी एक शेजारी देश पाकिस्तान भारताविरूद्ध दहशतवादी कारवाया करतो आहे. मात्र, भारतही त्याला चोख प्रत्त्यूत्तर देत आहे. भारतीय सैनिक दररोज पाच ते सहा दहशतवादी मारत असल्याची माहितीही राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
पुढे बोलताना राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, भारतात दहशतवादी पाठवून भारतातील यंत्रणा कमजोर व्हावी व देशात विभागनी व्हावी असे नापाक मनसुबे पाकिस्तान आखत आहे. पण, भारत पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावत आहे. सीमेवर तैनात असलेल्या जवानांना पहिल्यांदा आपण गोळी चालवू नका. पण, समोरून जर हल्ला झालाच तर त्यांना सोडू नका. जशास तसे उत्तर द्या, असे आदेश दिल्याचेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
सन २०२२ पर्यंत देशाला 'न्यू इंडीया' बनविण्याचे सरकारचे ध्येय असल्याचेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. या वेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बोलताना देशातील मागास समाजघटकांसाठी कॉंग्रेसला जबाबदार धरले.