Dolo Big Scam : डोलो 650 या पॅरासिटॅमोल औषधाची निर्माता कंपनीने मायक्रो लॅब्सनं मोठा घोटाळा केल्याचा दावा एका वैद्यकीय प्रतिनिधींच्या गटानं केला आहे. डोलो टॅब्लेट रुग्णांना लिहून देण्यासाठी डॉक्टरांना एक हजार कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याचा आरोप मायक्रो लॅब्सनं या कंपनीने केला आहे. यासंदर्भात कंपनीने सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना काळामध्ये ताप आल्यावर प्रत्येकाने डोलो टॅब्लेट घेतली असेल, कोविड काळात डॉक्टरही रूग्णांना डोलो टॅब्लेट  लिहून देत होते. हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीन वकील संजय पारीख यांनी केला आहे. (Federation of Medical and Sales Representatives Association of India)


डोलो कंपनीने 650 mg फॉर्म्युलेशनसाठी 1,000 कोटी रुपयांहून अधिक मोफत गिफ्ट वाटले आहेत. त्यामुळं डॉक्टर्स सर्व रुग्णांना या गोळीचे डोस लिहून देत असल्याचं संजय पारीख यांनी खंडपीठाला सांगितलं आहे. यासाठी माहितीचा स्त्रोत म्हणून त्यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अहवालाचा हवाला दिला आहे. (Central Board of Direct Taxes) 


दरम्यान, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतल्यानंतर गंभीर निरीक्षण नोंदवलं आहे. त्यासोबतच केंद्राला एका आठवड्यात जनहित याचिकेवर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. 10 दिवसांनंतर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.