देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खूष खबर !
यापुढे विमानाचं तिकिट रद्द केल्यास सरसकट ३००० रूपये आकारले जाणार नाही.
नवी दिल्ली : यापुढे विमानाचं तिकिट रद्द केल्यास सरसकट ३००० रूपये आकारले जाणार नाही.
प्रवाशांना भूर्दंड
याआधी जर देशांतर्गत विमान प्रवास विमानचं तिकिट रद्द केलं तर प्रवाशांना ३००० रूपयांचा भूर्दंड बसायचा. पण आता डायरोक्टोरेट जनरल ऑफ सिवील एविऐशनने यासंदर्भात सर्व विमान कंपन्यांना सूचना केल्यानंतर विमान कंपन्यांनी बदल केला आहे.
प्रवाशांना दिलासा
याआधी देशांतर्गत विमानसेवा देणाऱ्या कंपन्या निश्चित असा ३००० रूपयांचा चार्ज लावत होत्या. यापुढे मात्र मूळ प्रवासचा दर आणि इंधनाचा सरचार्ज किंवा ३००० रूपये यातील जी रक्कम कमी असेल ती प्रवाशांना द्यावी लागेल.
छोट्या शहरांसाठी विमानसेवा
काही प्रवाशी तिकिटाची नोंदणी बरीच आधी करून ठेवतात. त्यामुळे अतिशय कमी दरात तिकिटं मिळतात. अशा प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे. छोट्या शहरांमधील प्रवाशांना विमान प्रवासाचा लाभ घेता यावा. या शहरांमध्ये विमान सेवा वाढावी म्हणून सरकारने उडाण ही योजना आखली आहे.