१८ मेपासून मर्यादित विमानसेवा सुरू होणार
अशी करू शकता बुकिंग
मुंबई : सोमवारी १८ मे पासून विमानसेवा सुरू होणार आहे. लॉकडाऊननंतर अनेक लोकं वेगवेगळ्या शहरात अडकले आहे. त्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ट्रॅव्हल बुकिंग संकेतस्थळांवर १ जूनपर्यंत कोणतंही विमान तिकिट दिसत नाही. मात्र सोमवारपासून विमानसेवा सुरू होणार आहे.
एअर इंडियाकडून १८ मेपासून विमानसेवा
गृहमंत्रालयाच्या परवानगीनंतर एअर इंडियाने स्वतः १८ मेपासून काही विमानसेवा सुरू करणार आहे. एअर इंडियाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती मिळणार आहे.
असं कराव तिकिट बुकिंग
एअर इंडियाच्या संकेतस्थळावर कोरोना सेक्शन दिसेल. तिथेच बुकिंगच ऑप्शन आहे. तिथे जाऊन दोन पेजवर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्ही थेड बुकिंग पेजवर पोहोचाल. तिथे जाऊन बुकिंग करायचं आहे. त्यानंतर तिकिटाचा दर आणि सीटची माहिती मिळणार आहे. तिकिट बुक करण्यासाठी इथे क्लिक करू शकता.
या विमानसेवांची होणार बुकिंग
एअर इंडिया आंतरराष्ट्रीय आणि डोमॅस्टिक दोन्हीकडचे तिकिट उपलब्ध होणार आहे. मात्र याकरता काही अटी आहेत. भारत आपल्या नागरिकांना इतर देशांमधून परत आणणार आहे.
तसेच भारतात अडकलेल्या विविध देशांमधील नागरिकांना देखील परतण्याची तिकिट देण्याच्या शर्थीवर ही परवानगी देण्यात आली आहे. याची अधिक माहिती एअर इंडियाच्या हेल्पलाइन नंबरवर माहिती मिळू शकते.