मुंबई : Don Dawood Ibrahim terror plot : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim) पुन्हा सक्रीय झाल्याचा गौप्यस्फोट एनआयएने केलाय. दाऊद पुन्हा एकदा मुंबई आणि दिल्लीत मोठा घातपात घडवण्याचा कट रचत आहेत. दाऊदने यासाठी एक स्पेशल युनिट तयार केले आहे. ( Don Dawood Ibrahim terror plot to target many cities)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉन दाऊद इब्राहीम याने या स्पेशल युनिटद्वारे देशात महत्त्वाच्या शहरांमध्ये हिंसा घडवून आणण्याचा कट रचला आहे, असा गौप्यस्फोट एनआयएने केला आहे. दिल्ली आणि मुंबईत राहणारे काही मोठे नेते आणि व्यावसायिक दाऊद इब्राहीमच्या निशाण्यावर आहेत. 


अलिकडेच दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित विविध प्रकरणांचा तपास एनआयएने हाती घेतला आहे. दाऊद याच्या कारवायांची माहिती मिळताच एनआयएने 7 फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला आहे. 



विविध तपास यंत्रणा सध्या पुन्हा एकदा दाऊद गँगच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन आहे. देशात अनेक शहरांत दंगली घडवण्यासाठी गँगमध्ये काही जणांना दाऊद याने भरती केले आहे. धार्मिक तेढ निर्माण करून हिंसाचार घडवण्याचा कट आहे.