नवी दिल्ली : भारत भेटीवर येणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका खास ठिकाणी भेट देणार आहेत. ट्रम्प मिसेस प्रेसिडेंटसोबत प्रेमाची सर्वात मोठी निशाणी असलेल्या ताजमहालला भेट देणार आहेत. अमरेकिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा भारत दौरा शानदार आणि अविस्मरणीय ठरणाराय. कारण अमेरिकेचं हे फर्स्ट कपल प्रेमाचं प्रतिक असलेल्या ताजमहालाला भेट देणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी आग्र्यात जोरदार तयारी सुरू आहे. रस्ते, फुटपाथ, सगळं चकाचक केलं जातंय. एवढंच नव्हे तर नजीकच्या यमुना नदीचं पाणी स्वच्छ आणि नितळ दिसावं, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी यमुना नदीत हरिद्वारमधून ५०० क्यूसेक पाणी सोडलं जाणार आहे. चार दिवसांच्या प्रवासानंतर २१ फेब्रुवारीला हे पाणी यमुना नदीत पोहचेल. येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत यमुना काठोकाठ भरलेली दिसेल.


ट्रम्प यांचा हा दौरा अविस्मरणीय व्हावा, यासाठी उत्तर प्रदेश सरकार हरतऱ्हेचे प्रयत्न करतेय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः ताजमहाल परिसरात जाऊन व्यवस्थेची पाहणी केली.


२४ फेब्रुवारीला अहमदाबादच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी ट्रम्प पती-पत्नी आग्र्याला पोहोचणार आहेत. याठिकाणी शाहजहान आणि मुमताज यांच्या प्रेम कहाणीवर आधारित ताज द मोहब्बत हा खास शो त्यांना दाखवण्यात येणार आहे. ताजमहल शेजारच्या हॉटेल अमरविलासमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव २४ फेब्रुवारीला दुपारी २ पासूनच इतर देशी-विदेशी पर्यटकांसाठी ताजमहाल प्रवेश बंद करण्यात येणार आहे. एकूणच त्यांची ही ताजमहाल भेट अविस्मरणीय असेल.