नवी दिल्ली : भारतात दूध देणारे प्राणी मोठ्या प्रमाणात पाळले जातात. गाय, म्हैस किंवा बकरी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. उंटाच दूध प्यायल्याचंही तुम्ही ऐकलं असेल. पण आता देशभरात पहिल्यांदाच असं काही होतंय जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. तुम्ही आतापर्यंत म्हैस किंवा गायीच्या दुधाची डेअरी ऐकली असेल पण आता गाढविणीच्या दुधाची डेअरी देशात सुरु होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाढव या प्राण्याला आतापर्यंत आपण मस्करीतच घेतलं. पण या बातमीमुळे आपला हा विचार बदलू शकतो. आणि बदलणं देखील गरजेच आहे. कारण आतापर्यंत आपण उच्चारत असलेला गाढव हा शब्दप्रयोग फायदेशीर ठरणार आहे. शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गाढविणीच्या दुधाची भूमिका महत्वाची असते. 


राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र (एनआरसीइ) हिसारमध्ये गाढविणीच्या दुधाची डेअरी सुरु होणार आहे. एनआरसीई हिसारमध्ये हलारी जातीच्या गाढविणीच्या दुधाची डेअरी सुरु होतेय. यासाठी एनआरसीइने १० हलारी जातीच्या गाढविणी मागितल्या आहेत. सध्या यांची ब्रिडींग सुरु आहे. 



हलारी जातीची विशेषता
गाढवाची ही प्रजात गुजरातमध्ये आढळते. औषधी क्षेत्रासाठी हे दूध म्हणजे खजाना मानलं जातं. लहारी जातीच्या गाढविणीच्या दुधात कॅंसर, स्थूलपणा, एलर्जी सारख्या आजारांशी लढण्याची क्षमता असते.


मुलांना होत नाही एलर्जी 


अनेकदा म्हैशीच्या दुधापासून लहान मुलांना एलर्जी होते. पण हलारी जातीच्या गाढविणीच्या दुधापासून एलर्जी होत नाही. गाढविणीच्या दुधात एंटीऑक्साइड, एन्टीएजिंग हे गुण असतात. तर दुधामध्ये फॅट नाममात्र असतो. एनआरसीइचे माजी संचालक डॉक्टर बीएन त्रिपाठी यांनी गाढविणीच्या दुधावर संशोधन सुरु केलं होतं.


१ लीटरची किंमत ६ हजार रुपये


गाढविणीचं दूध बाजारामध्ये २ ते ७ हजार रुपये प्रति लीटर दरात मिळत. यातून सौंदर्य प्रसाधन देखील बनवली जातात, जे खूप महाग असतात. गाढविणीच्या दुधापासून लिप बाम, बॉडी लोशन, साबण तयार केले जातात. 


डेअरी सुरु करण्यासाठी एनआरसीई हिसारच्या केंद्रीय म्हैस अनुसंधान केंद्र आणि करनालच्या नॅशनल डेअरी रिसर्च इंस्टिट्यूटच्या वैज्ञानिकांची मदत घेतली जातेय.