इंदूर : दिवंगत लोकप्रिय संत भय्यूजी महाराज यांच्या मृत्यूसाठी त्यांची पत्नी डॉ. आयुषी हीच कारणीभूत असल्याचं, एक गुप्त पत्र पोलिसांना मिळालंय. डीआयजी हरिनारायणचारी मिश्र यांना गुरुवारी एक ११ पानांचं पत्र मिळालं. हे पत्र भय्यू महाराजांच्या एका 'विश्वासू सेवका'नं पाठवल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आलाय. परंतु, आपण भय्यू महाराज यांच्या मृत्यूचं गूढ जाणतो परंतु, आपल्या जीवाला धोका असल्यानं आपण स्वत:चं नाव जाहीर करू शकत नसल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवंगत संत भय्यू महाराज यांच्या आयुष्यात कलह त्याच दिवशी सुरू झाला होता ज्या दिवशी त्यांनी डॉ. आयुशीसोबत विवाह केला होता. आयुषीनं पहिल्यांदा त्यांना कुटुंबीयांपासून तोडलं... त्यानंतर आश्रमात भाऊ, काकाला बोलावून घेतलं. मुलगी कुहूपासूनही त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला, असंही या पत्रात म्हटलंय. 


भय्यूजींच्या पहिल्या पत्नीबद्दल चर्चा केली तर आयुषीच्या रागाचा भडका उडत होता. घरतील त्यांचे फोटोही हटवण्यात आले होते. महाराजांना कुहूशी बोलण्यापासूनही परावृत्त केलं होतं. महाराजांना आपल्याच नातेवाईकांशी लपून-छपून बोलावं लागत होतं. आयुषीचा भाऊ अभिनव आणि काका उमेश शर्मा आश्रमाकडून वेतनही घेऊ लागले होते. गेल्या दोन वर्षांपासून भय्यूजी महाराज तणावाखाली होते. डॉ. आयुषीसोबत विवाहानंतर ते एकटे पडले होते, असाही उल्लेख या निनावी पत्रात करण्यात आलाय.