नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील बदायूं मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला भगवा रंग देण्यात आला होता. पण आता पुन्हा एकदा मूर्तीला निळा रंग देण्यात आला आहे. कुंवरगावजवळच्या दुगरैय्या येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्याजागी नवा पुतळा बसवण्यात आला. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या कोटाला भगवा रंग देण्यात आला होता. बीएसपी नेता हिमेंद्र गौतम यांनी आंबेडकरांच्या मूर्तीचा रंग पुन्हा निळा केला आहे. सोमवारी नवी मूर्ती बनवल्यानंतर भगवा रंग देण्यात आला होता.


विटंबनाआधी पुतळा निळ्या रंगात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमी निळ्या रंगात दिसणारी डॉ. आंबेडकरांची मूर्ती उत्तर प्रदेशात मात्र पहिल्यांदाच भगव्या रंगात दिसत होती. ा पुतळा कोणी उभारलाय, याचीच जास्त चर्चा होत आहे. मात्र, या पुतळ्याची कोणीही जबाबदारी घेतलेली नाही. उत्तर प्रदेशमधील बदायू जिल्ह्यातील कुंवरगावजवळच्या दुगरैय्या येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्याजागी नवा पुतळा बसवण्यात आलाय. बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या कोटाला भगवा रंग देण्यात आला होता. पुतळ्याच्या विटंबनाआधी हा पुतळा निळ्या रंगात होता. 



कोणाचीही तक्रार नाही !


नवीन पुतळ्याचं अनावरण रविवारी पोलीस आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुतळा आहे त्याच जागी नव्यानं बसवण्यात आला. परंतु, पुतळ्याचा रंग निळ्याऐवजी भगव्या रंगात आहे. याबाबत कोणीही तक्रार केलेली नाही. उलट ग्रामस्थांनी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याला हार घालून फोटो काढले. आता बाबासाहेबांच्या पुतळ्यांवर पुन्हा निळा रंग चढवल्यामुळे एकच चर्चा सुरु आहे.