दिल्ली : अहमद पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साणंदमधील सभेत केला होता. मात्र या आरोपांचा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी साफ इन्कार केलाय. 


 
 नरेंद्र मोदींचा दावा काय ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 मणिशंकर अय्यर यांच्या घरी 6 डिसेंबरला पाकिस्तानचे माजी पराराष्ट्र मंत्री आणि भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त यांची गुप्त बैठक झाली, त्यात पटेलांना मुख्यमंत्री बनवण्याचे डावपेच ठरले, असा दावा मोदींनी केला होता. 


 
 मनमोहन सिंग यांची मागणी 


 राजकीय स्वार्थासाठी मोदींनी खोटे आरोप करू नयेत, असं सांगतानाच मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी मनमोहन सिंग यांनी केलीय.