डॉ. सुभाष चंद्रा फाउंडेशनला मोठं यश! दत्तक घेतलेल्या या गावानं मिळवला आदर्श गावाचा सन्मान
डॉ. सुभाष चंद्रा यांच्याकडून गावाचा कायापालट! शिक्षण, खेळ आणि आरोग्य प्रत्येक क्षेत्रात अव्वल हे ठरलं आदर्श गाव...
नवी दिल्ली: गाव आनंदी तर देश आनंदी आणि कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही गावातून केली तर त्याचे चांगले परिणाम देशभरात दिसून येतात. हाच विचार राज्यसभा सदस्य डॉ. सुभाष चंद्रा यांनी हरियाणा जिल्ह्यातील गावं दत्तक घेत केला. त्यांनी या गावांचं अख्ख रुप पालटलं. आज त्यांनी दत्तक घेतलेल्या एका गावाला आदर्श गाव म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
डॉ. सुभाष चंद्रा यांनी संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत या गावांना दत्तक घेतलं. केंद्र सरकारने याच आदर्श गावाचं उदाहरण इतर गावांसमोर ठेवलं आहे. सुभाष चंद्र यांनी सबका या गावांचा समुह दत्तक घेतला आहे. या ग्रूपमध्ये जी गावं आहेत त्या 5 गावांचा विकास आणि विविध योजना आणल्या आहेत. एक आदर्श गाव कसं असाव याचं उत्तम उदाहरण त्यांनी देशासमोर ठेवलं आहे.
SABKA याचा अर्थ आहे सदलपुर, आदमपुर, बरारवाला, खरा, किशनगढ़ आणि आदमपुर मंडी या गावांचा यामध्ये समावेश आहे. या गावांमधील लोकांच्या समस्या डॉ. सुभाष चंद्रा यांनी समजून घेतल्या. तिथल्या समस्यांवर सुभाष चंद्रा यांनी काम करायला सुरुवात केली. समाजातील प्रत्येक वर्गाचा विचार करून त्यांच्या गरजा समजून त्यावर योजना आणल्या आहेत.
सुभाष चंद्रा यांची मेहनत फलदायी ठरली. किशनगढची आदर्श गाव अशी वेगळी ओळख मिळाली. ग्राम स्वराजचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. आज या गावाचा आदर्श इतर गावांनी ठेवायला हवा.
1. ग्रामविकास समितीसह ग्रामपंचायतीचे बळकटीकरण- ग्रामविकास समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे बळकटीकरण करण्यात आले. गावात विकास योजनांच्या अंमलबजावणीपासून ते विकासकामांची खात्री ही समिती करते.
2. मूलभूत सेवांसाठी गावातील पायाभूत सुविधा- किशनगढ गावात मूलभूत सेवांची कमतरता नाही. येथे चांगल्या पंचायत इमारती, कम्युनिटी पार्क, क्रीडांगणे, रस्ते, प्राथमिक आरोग्य सुविधा, शाळा बांधण्यात आल्या आहेत, तर पूर्वीची परिस्थिती याच्या उलट होती.सुभाष चंद्रा फाउंडेशनद्वारे विकास
शिक्षण- डॉ. सुभाष चंद्रा फाउंडेशनद्वारे शिक्षणाचा समान अधिकार देण्यात यावा या अंतर्गत मुलींनाही शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करण्यात आले. 'सच विजय छात्रवृत्ति कार्यक्रम' माध्यमातून मुलींना सशक्त करण्याची मोहीम राबवली. या योजनेतून 100 गुणवान मुलींना 10,000 - 15,000 रुपयांची स्कॉलरशिप देण्यात येते. ज्यामुळे त्यांना शिक्षण्यासाठी मदत होते.
कृषी- शेतकऱ्यांचा हितासाठी प्रयत्न केले जातात. 5000 शेतकऱ्य़ांना इथे स्किल डेवलपमेंट कार्यक्रमांतर्गत ट्रेनिंग देण्य़ात आलं आहे. ऑर्गेनिक क्लस्टर विकास, केवीके फार्म असे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रकल्प राबवण्यात आले आहेत. तर रोजगार वाढवण्याच्या दृष्टीनं इथे प्रयत्न केले जात आहेत.
खेळ- बॉक्सिंग, एथलेटिक्स, थ्रोबॉल अशा विविध खेळांचं ट्रेनिंग इथल्या तरुणांना देण्यात येतं. 100 हून अधिक मुलं राज्यस्तरीय स्पर्धेत पोहोचली आहेत. श्री होशियार सिंह आणि श्रीमती इंद्रावती देवी यांचा मुलगा अमित याने डॉ. सुभाष चंद्र फाउंडेशनच्या मदतीनं आपलं स्वप्न पूर्ण केलं. त्याला भारतीय सैन्यदलात भरती व्हायचं होतं. त्याचं ट्रेनिंग आणि शिक्षण यासाठी या फाउंडेशननं मदत केली.
महिला सशक्तिकरण- किचन गार्डन, जैविक शेती अशा प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या अंतर्गत लोकांना आता घरासाठी ताज्या भाज्यांसाठी बाजारावर अवलंबून राहावे लागणार नाही. अनेक शेतकरी कुटुंबांना किचन गार्डनच्या माध्यमातून भाजीपालाही पुरविला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण केले जात आहे.
शेतकरी- सुभाषचंद्र फाऊंडेशन संचालित फार्मर प्रोड्युसर कंपनी ही शेतकऱ्यांची कंपनी आहे. हा कार्यक्रम चांगला बाजार, चांगला भाव, कृषी सल्लागार, खरेदी आणि शेतकरी सेवा सुनिश्चित करण्यासाठी चालवला जात आहे. सुमारे 350 शेतकरी याच्याशी निगडीत आहेत.