Hyper Local News App Pinewz: राम मंदिरात आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज मान्यवर अयोध्येत उपस्थित झाले आहेत. Essel Groupचे संस्थापक आणि माजी राज्यसभा खासदार डॉक्टर सुभाष चंद्रा हेसुद्धा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या खास क्षणी सुभाष चंद्रा यांनी मोठी घोषणा केली आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या या खास क्षणी चंद्रा यांनी Hyper Local App PINEWZ लाँच केले आहे. या अॅपच्या माध्यमातून गाव-खेड्यापासून ते देशातील कानाकोपऱ्यातील बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुभाष चंद्रा यांनी हे अॅप लाँच करताना म्हटलं आहे की, आजचा दिवस खूप खास व महत्त्वाचा आहे. भारत व संपूर्ण जगासाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. काही लोक अयोध्येत उपस्थित आहेत. तर काही जण आपल्या घरातूनच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहेत. या अॅपवर तुमच्या शहरातील किंवा परिसरातील बातम्या किंवा घटना तुम्ही अपलोड करु शकणार आहेत. आज पिनन्यूज लाँच होत असून डिजिटल क्षेत्रातील ही मोठी क्रांती ठरणार आहे. 


 PINEWZ  अ‍ॅप लाँच


 



अयोध्येतून सुभाष चंद्रा यांनी हे अॅप लाँच केले आहे. तसंच, अॅप लाँच करताना देशातील नागरिकांना आजच्या या ऐतिहासिक दिनाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, या अॅपच्या माध्यमातून देशातील लाखो-करोडो लोक पत्रकार बनू शकणार आहेत. तुमच्या शहर किंवा आजूबाजूच्या परिसरातील बातम्या, फोटो-व्हिडिओ या अॅपच्या माध्यमातून अपलोड करु शकता. तुमची बातमी संपूर्ण जगापर्यंत पोहोचू शकते. त्या शहराची किंवा त्या गावाची बातमी संपूर्ण जगभरात पसरू शकते, असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.


अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


वेबसाइटला भेट देण्यासाठी या लिंकवर क्लिक करा