`एका युगाचा अंत...` लतादीदींना डॉ. सुभाष चंद्रा यांनी वाहिली श्रद्धांजली
`एका युगाचा अंत...`
मुंबई : 'एका युगाचा अंत... भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपूरे...' भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी देखील भावना व्यक्त केली आहे. लता दीदींच्या निधनानंतर भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपूर पडतील असं ते म्हणाले.
खासदार डॉ. सुभाष चंद्रा ट्विट करत म्हणाले, 'एका युगाचा अंत झाला आहे. लता दीदींच्या आत्म्याला शांती लाभो... त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपूरे पडतील...' त्यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या बातमीने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरवली आहे. महिनाभरापासून त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत होते.
पण आज अखेर 29 दिवसांची झुंज संपली आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून लता दीदी आयसीयूमध्ये होत्या.