सेल्फी स्टंट फसला, लोकलने धडक दिल्याने तरूण गंभीर जखमी
सेल्फी कुठे काढावा, कसा काढावा याचे साधे नियमही लोक पाळत नाही. मग सेल्फी काढण्याच्या नादात लोक आपला जीव धोक्यात घालतात याचे एक जीवंत उदाहरण हैदराबादमध्ये घडले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हैदराबाद : सेल्फी कुठे काढावा, कसा काढावा याचे साधे नियमही लोक पाळत नाही. मग सेल्फी काढण्याच्या नादात लोक आपला जीव धोक्यात घालतात याचे एक जीवंत उदाहरण हैदराबादमध्ये घडले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हैदराबादच्या एमएटीएस ट्रेनसमोर एक तरूण सेल्फी स्टंट करायला गेला. यात तो मागून येणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ काढत होता. पण त्याला अंदाज आला नाही की आपण रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ उभे आहोत.
भोंगा वाजवत येणारी ही ट्रेनने या तरूणाला मागू धडक दिली. धडक दिल्यावर हा व्यक्ती दूरवर फेकला गेला. या व्यक्ती विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
हैदराबाद या तरुणाचं नाव शिव असल्याचे समजत आहे. काही स्थानिक वृत्तवाहिनींच्या माहितीनुसार ही घटना तीन दिवसांपूर्वी हैदराबादमधल्या भरतनगर स्थानकावर घडली. हा तरुण धावत्या ट्रेन समोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. तो रेल्वेरुळाच्या अगदी बाजूला होता, या तरुणाला जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्यापासून त्याच्या मित्रानं रोखलंदेखील पण, या तरुणानं त्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे सेल्फीच्या नादापायी मागून वेगानं येणाऱ्या ट्रेनची धडक त्या तरूणाला बसली. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा व्हिडिओ तुमचे लक्ष विचलीत करू शकतो