मुंबई : मद्यप्राशन करणं हे शरीरासाठी घातक आहे. असं असलं तरीही मद्यप्राशन करणं अनेकांना आवडतं. आता सरकारनेच मद्यप्रेमींसाठी कायद्यात मोठा बदल केला आहे. मद्यप्राशनासाठी वयात बदल केला आहे. २५ वर्षांवरून ही मर्यादा २१ वर्षांपर्यंत केली आहे. (Drinking Age reduce in this state assembly passed amendment to the excise act ) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा एक्साइज कायदा १९१४ च्या एकूण चार कलमांवर विचार करण्यात आला. हरियाणाच्या सुधारित उत्पादन शुल्क विधेयकाला राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची संमती मिळाली आहे. ही दुरुस्ती राज्यात 11 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली आहे.


कायद्यातील बदलानंतर मोठी समस्या 


कायद्यातील बदलानंतर, कोणत्याही देशी दारू किंवा ड्रग्जच्या निर्मिती, घाऊक किंवा किरकोळ विक्रीसाठी वयोमर्यादाही कमी करण्यात आली आहे. 


कायद्यात सुधारणा केल्यानंतर राज्य सरकारने या व्यवसायाची वयोमर्यादा 25 वर्षांवरून 21 वर्षे केली आहे.


वयोमर्यादा कमी करून २१ केली 


कलम २९ अंतर्गत लायसन्स विक्रेता २५ वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तीला मद्य अथवा ड्रग्स वितरीत करू शकत नाही. अभ्यासानंतर ही वयोमर्यादा कमी करून २१ वर्षे केली आहे. 


मद्य विक्रीच्या दुकानातही वयोमर्यादा घटवली 


कलम ३० अंतर्गत या अभ्यासानंतर २५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीला मद्य विक्रीच्या दुकानावर कामावर ठेवण्यात येऊ शकतं. 


मद्य विक्रीच्या दुकानात आता २१ वर्षांपर्यंतची व्यक्ती नोकरी करू शकते. 


या राज्यात झाला मोठा बदल 


देशातील हरियाणा या राज्यात मद्य विक्रीच्या आणि खरेदीच्या कायद्यात मोठा बदल झाला आहे. 


देशातील अनेक राज्यात मद्य विक्री आणि खरेदीकरता २१ वर्षे ही वयोमर्यादा आहे.