कारचे ब्रेक फेल झाले तर काय करावं? जाणून घ्या माहिती
बऱ्याचदा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाले असल्याचे तुम्ही ऐकलेच असेल. या अशा अपघातात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
मुंबई : बऱ्याचदा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाले असल्याचे तुम्ही ऐकलेच असेल. या अशा अपघातात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशी वेळ कधीही कोणावरही येऊ शकते. कारण कितीही झालं तरी एक तंत्रज्ञानच ते, त्यामुळे त्यात कधी कोणता बिघाड येईल हे सांगता येणं शक्य नाही. परंतु कारचे ब्रेक निकामी झाल्यास काय करावे हे फार कमी कार चालक असतील. बहुतेक लोक चिंताग्रस्त होतील आणि काही मोठे नुकसान करतील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, जर चालत्या गाडीचे ब्रेक निकामी झाले, तर कोणत्या उपायांनी तुम्ही तुमचे प्राण वाचवू शकता.
1. सर्वप्रथम, तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही
ब्रेक फेल झाल्याची माहिती मिळताच लोक घाबरतात आणि गोंधळून चुकीचं पाऊल उचलतात. तसेच घाबरल्यामुळे परिस्थीती अधिक अनियंत्रित होते. त्यामुळे तुम्ही शांत राहून खाली नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करणे चांगले आहे.
2. पार्किंग दिवे चालू करा
पार्किंग दिवे (धोका) आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही चालू करा. वाहनाचे पार्किंग दिवे चालू केल्याने, मागून येणाऱ्या वाहनाला कळते की तुमच्या वाहनात काही समस्या असू शकते. तसेच जोरजोरात हॉर्न वाजवा.
3. गियर बदला
ब्रेक काम करत नसल्यास, तुमचा गियर बदला. जेव्हा वाहन सर्वात टॉप गेअरवरून खालच्या गेअरवर शिफ्ट होते. तेव्हा त्याचा वेग कमी होतो. ऑटोमॅटिक कारमध्येही तुम्हाला तेच करावे लागेल. बर्याच ऑटोमॅटिक कारमध्ये मॅन्युअल सेटिंग्ज देखील प्रदान केल्या जातात.
लक्षात ठेवा की, तुम्हाला एक-एक गीअर्स कमी करावे लागतील. म्हणजेच, जर कार 5 व्या गेअरमध्ये असेल तर प्रथम ती 4थ्या गेअरमध्ये हलवा. मग तिसऱ्या... असं करत दुसऱ्या आणि मग पहिल्या गेअरवर शिफ्ट करा. ज्यामुळे वाहनाची स्पीड कमी होते. ज्यामुळे मोठा अपघात तुम्ही टाळू शकता.
4. कार बाजूला चालवा
ब्रेक निकामी झाल्यास गाडी रस्त्याच्या मधोमध ठेवू नका आणि लगेच बाजूला करा. मध्येच गाडी चालवल्याने तुम्ही अपघाताला बळी पडू शकता आणि इतर कोणाचेही नुकसान करू शकता.
5. आपत्कालीन हँडब्रेक वापरा
अशा स्थितीत हँडब्रेकचा वापर करावा, पण ते सावकाश करावे लागेल हे लक्षात ठेवा. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवर हँडब्रेक खूप वेगाने लावल्याने कार घसरते आणि तुम्हाला दुखापत होऊ शकते.