नवी दिल्ली : ड्रायव्हिंग लायसेंसशी संदर्भात काही नियमांमध्ये केंद्र सरकारने बदल केले आहेत. ड्रायव्हिंग लायसेंससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. केंद्र सरकार डीएलची प्रक्रिया सोपी केली आहे. जाणून घेऊ या सरकारच्या या निर्णयाबाबत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रायव्हिंग लायसेंसशीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची गरज नाही. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने सुधारणा केलेले नियम या महिन्यापासून लागू केले आहेत. या नियमांमुळे ड्रायव्हिंग लायसेंससाठी वेटिंगमध्ये असलेल्यांना दिलासा मिळणार आहे.


मंत्रालयाच्या वतीने अर्जदारांना सुचित करण्यात आले की,  जे ड्रायव्हिंग लायसेंस मिळवण्यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आपली नोंदणी करू शकता.ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून ट्रेनिंग घेतल्यानंतर तेथेच टेस्ट द्यावी लागेल. स्कूलतर्फे अर्जदाराला सर्टफिकिट देण्यात येईल.  या सर्टफिकिटच्या आधारे ड्रायव्हिंग लायसेंस बनवण्यात येईल.


ट्रेनिंग सेंटर्सच्या संदर्भात मंत्रालयाच्यावतीने काही मार्गदर्शक नियम आणि अटी बनवण्यात आल्या आहेत.